गणपती बाप्पा मोरया.. पुढच्या वर्षी लवकर या..
गेली अनेक वर्ष श्रीमती मालती रामचंद्र मोंडकर यांच्या घरी बाप्पाचे आगमन होत आहे. मोंडकरांच्या बाप्पाचे शुक्रवार 18 सप्टेंबर 2026 रोजी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील निसर्गरम्य असलेल्या देवगड च्या सुंदर समुद्रात राजू मोंडकर. पुष्पावहिनी, संजय मोंडकर, श्रद्धा मोंडकर, सुखदेव जोशी, सुनिल बनसोडे आणि बच्चे कंपनी तथा भाविकांच्या उपस्थितीत अगदी आनंदात बाप्पाचे विसर्जन झाले.. या प्रसंगी मोंडकर फॅमिली आणि त्यांच्या मित्रमंडळींच्या मनात आनंद आणि बाप्पाचे विसर्जन होणार म्हणून रुखरुख होती.. दरवर्षी प्रकाश मोंडकर हे या बाप्पाच्या आगमनासाठी व बाप्पाच्या सेवेसाठी जीव ओतीत आलेले आहेत व प्रतिवर्षी त्यांना त्यांच्या घरातील लहान थोर आणि मित्रमंडळी मोलाची साथ देत असते..
- सुनिल बनसोडे. व्यवस्थापक / विशेष प्रतिनिधी शब्द खड्ग डिजिटल वृत्तपत्र..
Shabda Khadag © 2026. All Rights Reserved.
Developed By Vighnesh Technologies.