माझा बाप्पा.. प्रकाश मोंडकर यांचा देवगड चा राजा..

बाप्पा माझा लाडाचा.. गणपती बाप्पा मोरया.. 

व्यवसायाने मरीन इंजिनिअर असलेले प्रकाश मोंडकर यांचा देवगड येथील गणपती बाप्पा भक्तांचे आकर्षण ठरत आहे. देवगडचे असीम निसर्ग सौन्दय आणि  त्यात गणपती बाप्पाची आरती. सोबत टाळ मृदूंगाचा नाद आसपासच्या परिसरात भक्तिमय चैतन्य पसरवीत आहे.. या गणपतीला खूप मजा असते. समुद्राची गाज आणि भजनाचा आवाज यांचे एकत्रीकरण वातावरणात आनंदाची बरसात करते.. राजू मोंडकर, पुष्पा वहिनी, मोंडकर फॅमिलीची आई श्रीमती मालिनी रामचंद्र मोंडकर,  प्रकाश मोंडकर, श्रद्धा मोंडकर, संजय मोंडकर, बच्चे  कंपनी प्रज्योत आणि तनया त्याच बरोबर डोंबिवली वरून खास दरवर्षी  मोंडकरांच्या गणपतीसाठी देवगडला जाणारे फॅमिली फ्रेड सुनिल बनसोडे आणि सुखदेव जोशी यांच्या उपस्थितीत हा सोहळा संपन्न होत आहे. आमच्या बाप्पा ची दखल थेट मुंबई ( डोंबिवली ) वरून शब्द खड्ग डिजिटल वृत्तपत्राने घेतल्याने आम्ही शब्द खड्गचे आभारी आहोत अशा भावना मोंडकर कुटुंबीयांनी व्यक्त केल्या आहेत.. 

- प्रा. दिपक जाधव. संपादक शब्द खड्ग डिजिटल वृत्तपत्र..

42

जाहिरात

ट्रेंडिंग बातम्या

Get In Touch

Dombivli

+91 9967872052

shabda.khadag@gmail.com

Follow Us
लोकप्रिय बातम्या

Shabda Khadag © 2026. All Rights Reserved.

Developed By Vighnesh Technologies.