ज्याला रुजायचं तो दगडातही रुजतो..

ज्याला रुजायचं  तो दगडातही रुजतो आणि ज्याला रुजायचच नाही तो कुठेही टाका रुजतच नाही. आपल्या आयुष्यात अनेक माणसे येतात जातात..

काही माणसे खूप मनस्वी असतात ती न बोलता आपल्याला खूप काही देऊन जातात. आता हे देऊन जाणे म्हणजे पैसे नव्हे तर ती माणसे आपल्याला अनुभव, प्रेम आणि त्यांचे आपल्या मैत्रीप्रति असलेले शंभर टक्के योगदान देऊन जातात. मात्र, काही माणसे सतत नकारात्मकच  बोलत असतात. त्यांना तेलात तळा नाहीतर तुपात घोळा.. अशी माणसे सतत नकारात्मकच बोलत राहतात. सतत परिस्थिती, तब्येत इत्यादी इत्यादी रडगाणी गात राहतात. अहो  समस्या कुणाला नाहीत, प्रत्येकालाच असतात. पण, शेवटच्या श्वासापर्यंत जे लढतात तेच यशस्वी होतात. म्हणून मला नकारात्मक बोलणाऱ्यांचा आणि हिंमत हरलेल्यांचा खूप राग येतो. जे सतत रडगाणं गात राहतात अशा लोकांपासून दूर रहावे. कारण त्यांची नकारात्मक प्रवृत्ती आपल्याला नकारात्मक बनविते.. 

- प्रा. दिपक  जाधव. संपादक शब्द खड्ग डिजिटल वृत्तपत्र..

115

जाहिरात

ट्रेंडिंग बातम्या

Get In Touch

Dombivli

+91 9967872052

contact@shabdakhadag.in

Follow Us
लोकप्रिय बातम्या

Shabda Khadag © 2026. All Rights Reserved.

Developed By Vighnesh Technologies.