गोड बोलून टाळणारी माणसे..

माणसाच्या स्वभावाचा थांगपत्ता आजवर कुणालाच लागलेला नाही. माणूस स्वतः कसा वागेल हे सुद्धा त्या माणसाला निश्चितपणे सांगता येत नाही.. सांगता येणार नाही. आपल्या आजूबाजूला असे वेगवेगळ्या चेहऱ्याचे आणि स्वभावाचे आणि बोलणारे लोक सर्रासपणे आढळून येतात..

त्यात महिलांच्या स्वभावाचा थांग लागणे अथवा तळ गाठणे कुणालाच जमलेले नाही. काही माणसे अतिशय स्पष्ट असतात रोखठोक बोलतात.. काही घाबरत अर्धसत्य बोलतात. याचा अर्थ असा की अर्धसत्य बोलल्याने जर आपल्या अंगावर एखादी गोष्ट आलीच तर मला असं बोलायचंच नव्हतं तुम्ही गैरसमज केलात असे बोलून ही माणसे स्वतःची बाजू सावरून घेतात. मात्र, रोखठोक बोलणारी माणसे मनाने खूप साफ असतात जे आहे ते तोंडावर बोलतात. उगीचच कुणाला हरभऱ्याच्या झाडावर चढवीत नाही.. रोखठोक माणसे जीवाला जीव देणारी असतात ती कधीच कुणालाच फसवित नाहीत..

आता गोड बोलून टाळणाऱ्या माणसांबद्दल बोलूयात.. ही माणसे तोंडावर इतकी साखर घोळून बोलतात आणि माझ्या एवढी तुझी काळजी दुसऱ्या कुणालाच नाही असे दाखवीत असतात. पण, ही माणसे ऐनवेळी काहीही कारण सांगून पळून जातात.. खरं तर गोड बोलणारी माणसे काही कारणाने अथवा भितेने आपल्याला टाळत असतात. आपली काय चूक झाली आहे किंवा मी का येत नाही याचे खरे कारण सांगण्याची या गोड बोलणाऱ्या व्यक्तींमध्ये हिंमत नसते. ही अशी गोड बोलून टाळणारी माणसे खूपच घातक असतात कारण हे लोक ऐनवेळी आपल्याला दगा देऊन पळून जाऊ शकतात. विशेष म्हणजे असे की, या लोकांना वाटते की हे जे वागतात ते समोरच्याला अजिबात कळत नाही.. पण, असे नसते समोरच्याला तुम्ही गोड बोलून टाळताय हे पूर्णपणे कळत असते. मात्र, समोरचा बघूया तुम्ही गोड बोलून अजून किती फसवताय हे बघण्यासाठी गप्प असतो. म्हणून जे आहे ते स्पष्ट बोलावे आणि मैत्री केली तर ती शेवटच्या श्वासापर्यंत निभवण्याची ताकद ठेवावी..

- प्रा. दिपक जाधव. संपादक शब्द खड्ग डिजिटल वृत्तपत्र..

88

जाहिरात

ट्रेंडिंग बातम्या

Get In Touch

Dombivli

+91 9967872052

contact@shabdakhadag.in

Follow Us
लोकप्रिय बातम्या

Shabda Khadag © 2026. All Rights Reserved.

Developed By Vighnesh Technologies.