मित्रांनो खूपदा असे होते की, आपली चूक नसतांनाही समोरची व्यक्ती आपण चुकलो आहे असे समजून आपले काहीच ऐकण्याच्या मनस्थितीत नसते. जे आपले असतात त्यांना कारणे देण्याची अजिबात गरज लागत नाही. आणि जे भांडण उकरून काढणारे असतात अथवा ज्यांना तुमच्या सोबत रहायचच नसतं अशाच व्यक्ती मुद्दाम छोट्या छोट्या गोष्टींवरून रुसून बसतात. मुळात ज्या व्यक्तींना आपल्यापासून दूर जायचे असते ना त्या व्यक्ती मनाने केव्हाच आपल्यापासून दूर गेलेल्या असतात म्हणूनच अशा व्यक्तींना नाहक अडवून ठेवण्यात काहीच अर्थ नसतो. जाऊ द्यावे अशा व्यक्तींना.. उगीचच मजबुरीचा राम राम करण्यात काहीच अर्थ नसतो. हल्ली बहुतांश लोक फक्त गरज काढून घेणारे असल्याने तुमच्या भाव भावनांना काहीच अर्थ उरलेला नसतो.. आणि म्हणूनच ज्यांना मिनातवाऱ्या करून खूप समजावून सांगूनही जे थांबायलाच तयार नसतात त्यांना उगीचच थांबवून ठेऊ नका..
- प्रा. दिपक जाधव. संपादक शब्द खड्ग डिजिटल वृत्तपत्र..
Shabda Khadag © 2026. All Rights Reserved.
Developed By Vighnesh Technologies.