मंगळवार 30 जून 2026 रोजी ॲड. प्रदीप सुमन एकनाथ बावस्कर शब्द खड्गचे कायदेविषयक सल्लागार यांच्या मातोश्री कै. सुमन बावस्कर यांची द्वितीय पुण्यतिथी डोंबिवली येथे सात्विक वातावरणात संपन्न..
कै. सुमन बावस्कर यांनी पती निधनानंतर अत्यंत मेहनतीने आणि पोटाला चिमटा देऊन त्यांची पाच मुले वाढीविली. त्यांनी फक्त मुलांना वाढविलेच नाही तर चांगले सुसंस्कार दिले त्यामुळे त्यांचे तीन मुलगे आणि दोन मुली आज समाजात ताठ मानेने उभे आहेत. शिक्षण आणि मेहनतीला पर्याय नाही हे सुमन आई जाणून होत्या. या सर्व गोष्टींबरोबर अंगी प्रामाणिकपणा आणि गोर गरिबांच्या मदतीला धावून जाण्याची शिकवण बावस्कर आईने त्यांच्या मुलांना आणि नातवंडांना दिली. ॲड. प्रदीप यांनी तर आजच्या काळात श्रावण बाळा प्रमाणे आपल्या माता -पित्याची सेवा केली. समाजात हे कुटुंब अतिशय आदर्श म्हणून ओळखले जात आहे. कै. सुमन आई एकनाथ बावस्कर यांच्या द्वितीय पुण्यस्मरणा निमित्त शब्द खड्गचे संपादक प्रा. दिपक जाधव, शब्द खड्गचे विशेष प्रतिनिधी आणि समाजसेवक शाम चौगले आणि शब्द खड्ग परिवारातर्फे सुमन आईंच्या स्मृतीस विनम्र अभिवादन..
- प्रा. दिपक जाधव. संपादक शब्द खड्ग डिजिटल वृत्तपत्र..
Shabda Khadag © 2026. All Rights Reserved.
Developed By Vighnesh Technologies.