वरील चित्रात डोंबिवली येथून सुटणारी सकाळी नऊ वाजून १० मिनिटांची ही ट्रेन आहे.. बघा इतक्या गर्दीत प्रवास करावा लागत आहे..
दुरून बघणाऱ्याला शहरातील जीवन खूप गोड आणि छान छान वाटते. मात्र, प्रत्यक्षात असे अजिबात नाही.. काहीही संकट आले तरी मुंबईकर उठून उभे राहतात असे बोलले जाते आणि याला मुंबईचे स्पिरिट असे बोलले जाते.. मात्र, प्रत्यक्षात याला जगण्याची अपरिहार्यता म्हणतात, मजबुरी म्हणतात आणि जगण्याची लढाई म्हणतात, गावी असलेल्या आई वडिलांना पैसे पाठवायचे असतात. स्वतःला आणि कच्च्या बच्च्यांना जगवायचे असते म्हणून जीवाच्या आकांताने केलेला प्रवास म्हणतात. एकतर महाराष्ट्र राज्य अगोदरच चार सहा इतर राज्यांना पोसत असल्याने शहरांची लोकसंख्या प्रचंड वाढलेली आहे.
मराठी माणूस मूळ मुंबईच्या बाहेर पडू लागला आहे. आणि परके मुंबईचे बाप बनू पाहत आहेत.. कुठेतरी ही गर्दी थांबायलाच हवी नाहीतर गर्दीचा महापूर माणसाला आणि माणसातील माणुसकीला पूर्णपणे खाऊन टाकील. तशीही शहरात माणुसकी औषधा पुरतीच शिल्लक राहिलेली आहे. बाजूला कुणी चक्कर येऊन पडले तरी लोक म्हणतात दारू पिऊन पडला असेल.. दुरून डोंगर साजरे असतात मित्रांनो.. मी तर इथे स्पष्टपणे म्हणेल की, ज्याची गावाला व्यवस्थित प्रॉपर्टी असेल त्याने मुंबईच्या गर्दीत येऊन अपघाती मरण्या पेक्षा आणि प्रदूषणात आयुष्याची पाच दहा वर्षे कमी करून घेण्यापेक्षा गावी रहावे आणि तेथील वातावरणानुसार व्यवसाय करून स्वतःची प्रगती करावी.. त्याच बरोबर महाराष्ट्र सरकारने इतर राज्यांतून महाराष्ट्रात येणारे परप्रांतीय लोकांचे थवे थांबवावेत..
- प्रा. दिपक जाधव. संपादक शब्द खड्ग डिजिटल वृत्तपत्र..
Shabda Khadag © 2026. All Rights Reserved.
Developed By Vighnesh Technologies.