आपल्या आयुष्यात एक तरी उनाड दिवस असावा..

आपल्यापैकी अनेक लोक हा काय म्हणेल आणि तो काय म्हणेल याची चिंता करीत घाबरून जगत आहे. आपण स्वतःपेक्षा लोकांचाच जास्त विचार करीत असल्याने जगणे हातातून सटकून जात आहे..

आपल्यापैकी फार थोडे लोक दुनियेला फाट्यावर मारून मनसोक्त जगतात. प्रामाणिकपणे सांगतो मला या लोकांचा खूप हेवा वाटतो. आपण रोजच्या जगण्याच्या लढाईच्या खूप साऱ्या चिंता करण्याच्या नादात स्वतः आतून जळत आहोत.. चिंता कुणाला चुकली आहे काय हो ? जन्माला आलो आहोत तर चांगल्या वाईट गोष्टी फेस कराव्या लागतीलच याची आपल्याला जाणीव असूनही आपण चिंताग्रस्त असतो. अगदी बेबंद होणे सुद्धा म्हणावे तितके सोपे नाही. पण आयुष्यात किमान एक तरी दिवस आपल्या हक्काचा आणि उनाड असावा ज्या दिवशी आपण फक्त आपल्या मनाजोगे जगावे. आपणच आपल्या मनाचे राजे व्हावे.. चिंता माणसाला आतून जाळते म्हणून आपण स्वतःला ओळखायला शिकायला हवे आणि महिन्यातून एक दिवस फक्त स्वतःसाठी काढावा. हा प्रयोग करून बघाच.. जर असे केले तर खूप सारी एनर्जी आपल्याला मिळेल आणि या एका उनाड दिवसाच्या आशेवर आपण पुढे महिनाभर जोमाने कष्ट करू.. काय वाटतं तुम्हाला ? बरोबर बोलतोय ना मी..??

- प्रा. दिपक जाधव. संपादक शब्द खड्ग डिजिटल वृत्तपत्र..

83

जाहिरात

ट्रेंडिंग बातम्या

Get In Touch

Dombivli

+91 9967872052

contact@shabdakhadag.in

Follow Us
लोकप्रिय बातम्या

Shabda Khadag © 2026. All Rights Reserved.

Developed By Vighnesh Technologies.