शब्द आणि वेळ पाळणारे आयुष्यात यशस्वी होतात..

हिंमत त्याची किंमत..

खूपशी मंडळी शब्द आणि वेळ पाळत नाही.. ते या गोष्टी पाळत नाहीत मात्र, त्यांच्यासाठी वाट पाहत थांबलेल्या  लोकांची मात्र ते नाहक वाट लावतात हे त्यांच्या लक्षात येत नाही. एकदा का नाव थापाड्या पडलं की मग तुमच्या बोलण्यावर कुणीच विश्वास ठेवत नाही. आणि हीच मंडळी आपण पाच मिनिट जरी उशिराने गेलो तरी खूप कांगावा करतात. गेलेली वेळ आणि दिलेला शब्द पुन्हा माघारी येत नसल्याने आपल्याला जिथे शक्य असेल तिथेच शब्द द्यावा. आणि एकदा का शब्द दिला की मग काहीही होवो माघार घ्यायची नाही.. काही मंडळींना समोरच्याने अत्यंत विश्वासाने आपल्यावर जबाबदारी  टाकली आहे याचे भानच नसते. हे लोक आपल्याच मस्तीत जगत असतात.. आला जन्म किमान आपल्याला जीव लावणाऱ्या  लोकांच्या कामी यावे ही उद्दात्त भावना आता संपत चालली आहे. रोजच्या जीवनात आपल्या सोबत सतराशे साठ माणसे असतात मात्र, आपल्यावर वेळ आल्यावर अथवा आपण मदतीच्या अपेक्षेने यांच्याकडे पाहिले असता किती लोक प्रत्यक्ष मदतीला येतात व किती लोक थापा मारून पळून जातात ये ज्याचे त्यालाच माहित असते.. आणि म्हणून शब्द आणि वेळ पाळणारेच आयुष्यात यशस्वी होतात असे आमचे स्पष्ट मत आहे.. 

- प्रा.  दिपक जाधव. संपादक शब्द खड्ग डिजिटल वृत्तपत्र..

84

जाहिरात

ट्रेंडिंग बातम्या

Get In Touch

Dombivli

+91 9967872052

contact@shabdakhadag.in

Follow Us
लोकप्रिय बातम्या

Shabda Khadag © 2026. All Rights Reserved.

Developed By Vighnesh Technologies.