माणुसकी व्हेंटिलेटरवर आहे..

मनातलं पान..

हल्ली आपल्या आजूबाजूला बहुतांश लोक फक्त गरजेपुरतेच उरलेले आहेत असा मी खूपदा अनुभव घेतला आहे आणि घेत आहे. आपण एखाद्याला हक्काने काही स्पष्ट बोललो आणि त्याची चूक दाखवून दिली तर ती व्यक्ती क्षणाचाही विचार न करता आपण त्याच्यासाठी पूर्वी किती काय काय केले आहे, त्याच्यासाठी किती मेलो आहोत हे विसरून जाते.. लोक फक्त गरजेपुरते आणि स्वार्थी झालेले मी रोज अनुभवतो आहे. काही तर इतके खोटारडे आहेत की, यांचे खरे बोलणे कुठले आणि खोटे बोलणे कुठले याचा शोध लावायला भिंगाची काच घेऊन बसावे लागेल. अशी आत्मकेंद्री मंडळी मला कुठे ना कुठे रोज भेटत आहे.. सर्व समोरच्याने करावे अशी अपेक्षा असलेली खूपशी मंडळी स्वतः फक्त काठावरून गंमत बघत असते.. आज खूपशी मंडळी चहा तर सोडा हो पण, साधं पाणी सुद्धा विचारीत नाहीत. आणि आपल्याकडून मात्र भरपूर अपेक्षा करतात. म्हणून भिकाऱ्याला ही भीक देतांना हजारदा विचार करा की तो त्या लायकीचा आहे की नाही.. माझे अनुभव या बाबतीत खूप बाईट असल्याने मी हे अनुभवाचे बोल बोलत आहे. आपल्या पैकी सुद्धा अनेकांना निश्चितच असे अनुभव आले असतील, येत असतील..

- प्रा. दिपक जाधव. संपादक शब्द खड्ग डिजिटल वृत्तपत्र..

115

जाहिरात

ट्रेंडिंग बातम्या

Get In Touch

Dombivli

+91 9967872052

contact@shabdakhadag.in

Follow Us
लोकप्रिय बातम्या

Shabda Khadag © 2026. All Rights Reserved.

Developed By Vighnesh Technologies.