वृक्ष लागवड आणि संवर्धन काळाची गरज..

पाऊस पडत नाही.. उष्णतेचे प्रमाण पहिल्यापेक्षा कित्येक पटीने वाढले आहे.. पशु पक्षी प्राण्यांचा उष्णता आणि पाण्याच्या अभावाने मृत्यू.. अशा घटना वारंवार आपल्या डोळ्यासमोर घडत असतांनाही आपण केवळ सरकारवर अथवा एखाद्या स्वयंसेवी संस्थेवर अवलंबून राहत आहोत. खरे तर प्रत्येकाने एक तरी झाड लावून त्याची जोपासना करावी असे सांगावेसे वाटते. शहरात काँक्रीटचे जंगल आणि काँक्रीटचेच रस्ते उभारल्याने पाण्याचा निचरा जमिनीत खोलवर होतच नाही. आपण तुफान वृक्षतोड करीत असल्याने पाऊस पडणार तरी कसा ? धार्मिक गोष्टींचे कारण देत हजारो झाडांची कत्तल केली जात आहे. मात्र, आपण इतके देवभोळे झालेले आहोत की आपल्याला पाऊण न पडण्याचे कारण आपण स्वतः आहोत हे ठाऊक असूनही पाऊस पडावा म्हणून आपण होम हवन करीत आहोत. आता देव कायमचा बाजूला ठेवा आणि पावसाला उशिरा का होईना पण सुरुवात झालेली आहे तेव्हा वृक्षारोपण करा, आहेत ती जंगले, पाणी, पशु, पक्षी वाचविण्याचा प्रयत्न करा आणि पाण्याचे योग्य नोयोजन करा. जंगले वाचली तर पाऊस पडेल आणि पाऊस पडला तर शेती होईल गुरा ढोरांसकट माणसांना खायला - प्यायला अन्न - पाणी मिळेल आणि आपली प्रगती होईल.. 

- प्रा. दिपक जाधव. संपादक शब्द खड्ग डिजिटल वृत्तपत्र..

211

जाहिरात

ट्रेंडिंग बातम्या

Get In Touch

Dombivli

+91 9967872052

shabda.khadag@gmail.com

Follow Us
लोकप्रिय बातम्या

Shabda Khadag © 2026. All Rights Reserved.

Developed By Vighnesh Technologies.