शाम चौगले यांचे राजकीय गुरु भाजपा नगरसेवक दिपेश म्हात्रे यांच्या सहकार्यातून विद्यार्थ्यांना वह्या वाटप..

डोंबिवली परिसरात भारतीय जनता पार्टीचे सुशिक्षित, धडाडीचे तथा प्रचंड अभ्यासू आणि दिलदार नगरसेवक म्हणून सुपरिचित असलेल्या दिपेश म्हात्रे यांच्या सहकार्याने धडाडीचे समाजसेवक शाम चौगले यांनी गुरुपौर्णिमेचे औचित्य साधून परिसरातील 500 शाळकरी विद्यार्थ्यांना वह्या वाटल्या..

या वह्या शाम चौगले यांचे राजकीय गुरु दिपेश म्हात्रे यांनी दिल्या. विद्यार्थी, माता - भगिनी, तरुण तथा ज्येष्ठ मंडळींच्या मागे नेहमीच हिमालया सारखे उभे राहणारे दिपेश म्हात्रे कल्याण - डोंबिवली तर सुप्रसिद्ध आहेतच पण ते अवघ्या महाराष्ट्र राज्यात सुद्धा सुपरिचित आहेत. शाम चौगले हे परिसरात दिपेश म्हात्रे यांचे अगदी कट्टर समर्थक म्हणून ओळखले जातात. गुरुस्थानी असलेले दिपेश म्हात्रे यांनी गुरुपौर्णिमेच्या दिवशी दिलेल्या वह्या ही विद्यार्थी आणि माझ्यासाठी अनोखी भेट आहे अशा भावना शाम चौगले यांनी शब्द खड्ग डिजिटल वृत्तपत्राशी बोलतांना व्यक्त केल्या.. काहीही झाले तरी दिपेश यांची साथ आपण सोडणार नसल्याचे शाम चौगले यांनी बोलून दाखविले.. 

- प्रा. दिपक जाधव. संपादक शब्द खड्ग डिजिटल वृत्तपत्र..

139

जाहिरात

ट्रेंडिंग बातम्या

Get In Touch

Dombivli

+91 9967872052

contact@shabdakhadag.in

Follow Us
लोकप्रिय बातम्या

Shabda Khadag © 2026. All Rights Reserved.

Developed By Vighnesh Technologies.