काठावरून गम्मत बघणारी मंडळी..

काठावरून गम्मत बघणाऱ्या मंडळींचा आपल्यापैकी अनेकांना अनुभव असेल. मला या अशा स्वरूपाच्या मंडळींचा इतरांपेक्षा जरा जास्तच अनुभव आहे. ही मंडळी सोबत असूनही सोबत नसतात..

यांची जेव्हा गरज असेल तेव्हा यांना आपली आठवण येते. ही मंडळी वेळ निघून गेल्यावर जागी होतात. यांना माहित सर्व असतं पण आपण पंतप्रधाना पेक्षा जास्त बिझी आहोत असे भासवून ही मंडळी खूपदा आपल्याला टाळत असतात. आपण साधे भोळे आहोत असे ही मंडळी उगाचच भासवीत असतात. हे लोक आपल्या अडचणीच्या काळी कधीच मागे उभे राहत नाहीत. आपल्याला प्रोत्साहन दिले तर यांचे कदाचित आयुष्य कमी होईल असे या लोकांना वाटत असावे. यांच्याकडे मनाचा मोठेपणा आणि आपल्या सहकाऱ्याला प्रोत्साहन देण्याचा मोठेपणा कमी असतो. या माणसांचे ओझे मात्र आपण सतत वहावे असे यांना वाटते. आर्य चाणक्य म्हटलेत की मूर्ख मित्रा पेक्षा हुशार शत्रू परवडला. एखादी नवीन गोष्ट घडविण्यात यांचे सहकार्य खूप कमी मिळते. हे लोक स्पष्ट विरोध करीत नाहीत आणि स्पष्ट पाठिंबा सुद्धा देत नाहीत. सतत दोलका प्रमाणे इकडून तिकडे हलत असतात.. यांना खोगीर भरती म्हटल्यास वावगे ठरू नये.. शेवटी कोण मेले कुणासाठी तंबू ठोकून..असे म्हणून जे चाललंय ते ठीक आहे असे समजून आपणच पुढे मार्गक्रमण करीत रहायचे..

- प्रा. दिपक जाधव. संपादक शब्द खड्ग डिजिटल वृत्तपत्र..

269

जाहिरात

ट्रेंडिंग बातम्या

Get In Touch

Dombivli

+91 9967872052

shabda.khadag@gmail.com

Follow Us
लोकप्रिय बातम्या

Shabda Khadag © 2026. All Rights Reserved.

Developed By Vighnesh Technologies.