स्वतःचं ठेवायचं झाकून आणि..

मानवी प्रवृत्ती आणि स्वभाव कधीच आणि कुणालाच कळू शकलेला नाही. आपण खूप मोठ्या प्रमाणात आत्मकेंद्री झालेले असल्याने आपण फक्त मी करेल तेच योग्य या विचारात स्वतःला गुरफटून घेतलेले आहे..

लोकांकडे एक बोट करतांना आपल्या स्वतःकडे चार बोटे आहेत हे आपल्या ध्यानातच येत नाही. लोकांच्या मुला मुलींना नावे ठेवतांना आपली मुले काय दिवे लावतात हे आपण सोयीस्कररित्या विसरतो.. आपण करू तेवढेच बरोबर ही स्वार्थी प्रवृत्ती आपल्यात फोफावलेली आहे. आपल्याला लोकांच्या डोळ्यातील कुसळ दिसते मात्र स्वतःच्या डोळ्यातील मुसळ दिसत नाही. आपण इतरांबद्दल अगदी वारेमाप मनाला येईल ते बोलतो.. इतरांची टीका आणि गॉसिप करण्यात आपल्यापैकी अनेकांना मोठा आनंद मिळतो. काही मंडळींच्या पोटात गोष्टी राहत नाहीत मग ते त्या गोष्टी आपापल्या बुद्धी नुसार पसरवतात आणि राई चा पर्वत होतो.. मुळात इतरांची टीका करून स्वतःचा वेळ वाया घालविण्या पेक्षा याच वेळेत काही विधायक काम करा. मात्र, आपल्या पैकी अनेकांकडून हे होत नाही. आणि म्हणूनच म्हणावं वाटतं की, स्वतःचं ठेवायचं झाकून आणि लोकांचा बघायचं वाकून..

- प्रा. दिपक जाधव. संपादक शब्द खड्ग डिजिटल वृत्तपत्र..

133

जाहिरात

ट्रेंडिंग बातम्या

Get In Touch

Dombivli

+91 9967872052

contact@shabdakhadag.in

Follow Us
लोकप्रिय बातम्या

Shabda Khadag © 2026. All Rights Reserved.

Developed By Vighnesh Technologies.