कोणतेही काम असो, ते एकट्या माणसाच्या खांद्यावर टाकले की त्याचा भार वाढतो. मात्र त्याच कामासाठी अनेकांनी आर्थिक आणि शारीरिक स्वरूपात आपापला हातभार लावला, तर मोठमोठी कामेही चुटकीसरशी पूर्ण होऊ शकतात..
समाजातील अनेक कामे केवळ आर्थिक मदतीअभावी किंवा माणसांच्या सहकार्याअभावी रखडतात. प्रत्येक वेळी एकाच व्यक्तीने पैसा खर्च करावा, वेळ द्यावा आणि धावपळ करावी, अशी अपेक्षा ठेवणे चुकीचे आहे. प्रत्येकाने आपापल्या क्षमतेनुसार योगदान दिले, तर कोणावरही अतिरिक्त भार पडणार नाही.
लक्षात ठेवा, मदत म्हणजे केवळ पैसे देणे नव्हे; तर वेळ देणे, श्रम देणे, योग्य सल्ला देणे आणि संकटाच्या वेळी खंबीरपणे पाठीशी उभे राहणे हेसुद्धा तितकेच महत्त्वाचे आहे. एकट्याची धडपड संघर्ष निर्माण करते, तर सर्वांची एकजूट यशाचा मार्ग मोकळा करते!
- प्रा. दिपक जाधव.. संपादक, शब्द खड्ग डिजिटल वृत्तपत्र..
Shabda Khadag © 2026. All Rights Reserved.
Developed By Vighnesh Technologies.