माझी फोटोग्राफी.. रिक्षावाले जवळचे भाडे नाकारतात आणि बस वेळेत येत नाही.. नागरिक त्रस्त.. - सुजित कुमार गुप्ता..

डोंबिवली सुशिक्षितांची नगरी म्हणून जरी सुपरिचित असली तरी डोंबिवलीत काही सुधारणा होणे काळाची गरज आहे. डोंबिवलीतील काही रिक्षावाले खूपच मुजोर आहेत. जवळचे भाडे नाकारतात  व बस वेळेत येते न येते यासर्व गोष्टींमुळे डोंबिवलीकर त्रस्त झाले आहेत..

रिक्षावाले आणि प्रवाशांची हुज्जत हे तर जवळपास रोजचेच झालेले आहे. पोटापाण्यासाठी सकाळी घर सोडायचे व लोकल मध्ये धक्के खात मुंबई, कर्जत, कसाऱ्याकडे जायचे आणि धक्के खात यायचे त्यात बसची वाट बघत रांगेत तासभर उभे राहायचे याने डोंबिवलीकर खूपच वैतागले आहेत. याबाबत अनेकदा आंदोलने होऊनही हा प्रश्न पूर्णपणे सुटलेला नाही.. शब्द खड्ग चे फोटोग्राफर सुजित कुमार गुप्ता यांनी डोंबिवली पूर्वेतील संध्याकाळची घरी जाण्यासाठी लोकांची बस कधी येतेय ही वाट बघत रांगेत उभी असलेली गर्दी त्यांच्या मोबाईल मध्ये टिपली आहे. या प्रश्नाला लवकरात लवकर वाचा फुटावी अशी अपेक्षा आहे..

- सुजित कुमार गुप्ता. फोटोग्राफर शब्द खड्ग डिजिटल वृत्तपत्र..

120

जाहिरात

ट्रेंडिंग बातम्या

Get In Touch

Dombivli

+91 9967872052

shabda.khadag@gmail.com

Follow Us
लोकप्रिय बातम्या

Shabda Khadag © 2026. All Rights Reserved.

Developed By Vighnesh Technologies.