शब्द खड्गचे कलाकार आणि नवोदित कलाकार यांना मंच मिळवून देण्यासाठी रविवार ३०ऑगस्ट २०२६ पासून हा प्रोजेक्ट सुरु केला आहे. यात आम्ही हलक्या फुलक्या शॉर्ट फिल्म बनवायला सुरुवात केली आहे..
कुणाला आमच्यासोबत काम करायचे असेल तर त्यांच्या घरातील आई, वडील, पती, भाऊ, बहीण अथवा जबाबदार व्यक्तीची आणि स्वतःची सहमती असेल तरच काम करावे. आम्ही आमच्या जाहिरातीत वारंवार असा उल्लेख केला आहे की, आमची कुणावरही बळजबरी नाही. ज्याला पटत असेल त्यानेच आमच्यासोबत काम करावे.. याउपर जर कुणी कलाकाराने अथवा त्याच्या नातेवाईकाने आमच्या टीमला नाहक त्रास देण्याचा प्रयत्न केल्यास आम्ही अशा कलाकार व त्यांच्या कुटुंबियांवर कायदेशीर कारवाई करू.. तुम्हाला जर पटत असेल तर आणि तरच आमच्या सोबत या असे आम्ही आमच्या जाहिरातीत वारंवार सागितले आहे व जो इच्छुक कलाकार आम्हाला भेटायला येतो त्यालाही हेच सांगत आहोत.. आणि आमच्या सोबत काम करणारी सर्व मंडळी 18 वर्षांच्या पुढील असावी हेही आम्ही वारंवार सांगत आहोत.. नवोदितांना जर अभिनय करण्याची इच्छा असेल आणि त्यांच्या घरातल्या मंडळींची या गोष्टीसाठी परवानगी असेल तर आणि तरच या नवोदित कलाकारांनी आमच्यासोबत यावे अन्यथा येऊ नये..
- प्रा. दिपक जाधव. संपादक शब्द खड्ग डिजिटल वृत्तपत्र..
Shabda Khadag © 2026. All Rights Reserved.
Developed By Vighnesh Technologies.