डोंबिवली माणकोली ब्रिज ट्रॅफिकच्या विळख्यात..

माणकोली ब्रिजवरून ठाण्याला वीस पंचवीस मिनिटांत पोहोचता येते. मात्र इथे सतत वाहतूक कोंडी असल्याने वीस पंचवीस मिनिटांत ठाण्याला पोहोचणे शक्यच होत नाही.. 

प्रवाशांची सोय व्हावी म्हणून बांधलेला मोठागाव डोंबिवली पश्चिम येथील माणकोली ब्रिज सध्या दुचाकी, चारचाकी प्रवाशांना सुविधा देण्या पेक्षा असुविधे साठीच गाजत आहे. विशेषतः सकाळ, संध्याकाळच्या वेळी इथे वाहनांची तुफान गर्दी होते.. डोंबिवली आणि भिवंडी वाहतूकवाल्यांच्या तोंडाला हा ब्रिज फेस आणतो. या ब्रिजवरून जाणे म्हणजे अक्षरशः आट्यापाट्या खेळत जाण्यासारखे झाले आहे असे वाहनचालकांचे म्हणणे आहे. वाहतूक विभागाकडे संख्याबळ जरी कमी असले तरी त्यांनी आणि संबंधितांनी माणकोली ब्रिजवरची वाहतूक कोंडी फोडावी व हा प्रश्न कायमचा निकाली काढावा अशी दुचाकी आणि चारचाकी वाहनचालकांची संबंधितांना कळकळीची विनंती आहे.. 

- द्वीप संतोष पूर्वा चेऊलकर. विशेष प्रतिनिधी शब्द खड्ग डिजिटल वृत्तपत्र..

169

जाहिरात

ट्रेंडिंग बातम्या

Get In Touch

Dombivli

+91 9967872052

shabda.khadag@gmail.com

Follow Us
लोकप्रिय बातम्या

Shabda Khadag © 2026. All Rights Reserved.

Developed By Vighnesh Technologies.