आपण माणुसकी जपणारी माणसं असल्याने आपण सतत जो येईल त्याच्या मदतीला धावतो. मदत करणे कधीच वाईट नाही. मात्र, जर तुम्ही चोवीस तास जो येईल त्याच्यासाठी उपलब्ध राहिलात तर मग कुणीही उठून तुम्हाला इमोशनली ब्लॅकमेल करून त्याचे काम काढून घेतो..
मला स्वतःला याचा फार वाईट अनुभव येतो आहे. लोक फक्त गरजेपुरते असतात. आपली गरज लागल्यावर फोन करतात आणि सर माझे अमुक एक काम आहे प्लिज करून द्या. आणि आपण काम करून दिले की मग तू कोण आणि मी कोण.. आणि अजून एक अत्यंत महत्वाचा मुद्दा.. कधीच कुणासाठी चोवीस तास उपलब्ध राहू नका.. नाही बोलायला शिका.. आपण जर कुणाही सोम्या - गोम्यासाठी सतत उपलब्ध राहिलो तर मग हे लोक आपल्याला गृहीत धरतात. हा काय रिकामाच आहे जरा गोड बोललं की लगेच पाघळतो.. माझ्या दिलदार स्वभावाने मी खड्ड्यात गेलो आहे. आणि म्हणून आता मी नाही बोलायला शिकलो आहे. आमच्या शब्द खड्ग वृत्तपत्रात अनेकांना फुकटात बातम्या छापून प्रसिद्धी हवी असते. मी आयोजित करीत असलेल्या गाण्यांच्या कार्यक्रमांतही फुकटात गायचे असते.. पण, आता मी स्पष्टपणे सांगतो की तुमच्या प्रसिद्धीच्या बातमीसाठी, गाण्यांसाठी पैसे लागतील. मी काय तुमची फुकट प्रसिद्धी करायला रिकामा बसलेलो नाही.. आणि म्हणून पुन्हा एकदा सांगतो जिथे आपल्या श्रमाला आणि आपल्याला मान आणि मोबदला मिळत असेल तिथेच जा आणि अशाच आपल्या मेहनतीची किंमत असलेल्या लोकांशी संबंध ठेवा.. फुकट्यांना बाजूला सारा.. आता हे ऐकल्यावर ज्याला माझ्याशी बोलायचं तो बोलेल आणि नाही बोलायचं तो गेला उडत..
- प्रा. दिपक जाधव. संपादक शब्द खड्ग डिजिटल वृत्तपत्र..
Shabda Khadag © 2026. All Rights Reserved.
Developed By Vighnesh Technologies.