वरून चकचकीत आणि स्वप्न वाटणाऱ्या मोठ्या शहरांत टिकायचे असेल व स्वतःचा विकास करायचा असेल तर स्वतःच्या पंखात बळ असावे लागते. आणि काहीही झाले तरी हिंमत न हरता येईल त्या प्रसंगाला खंबीरपणे तोंड देण्याची जिद्द असावी लागते.. जर तुमची आयुष्यावर न रागावता मेहनत करण्याची तयारी असेल तर तुम्ही इथे खूप काही करू शकता.. इथे जशा उंच इमारती आहेत तशीच आपली स्वप्ने सुद्धा उंच भरारी घेण्याची असावीत व त्याचा आपण पाठपुरावा करावा.. आणि कितीही प्रगती केली व उंच भरारी घेतली तरी पायाखालच्या जमिनीला आणि आपल्या जिवाभावाच्या माणसांना कधीच विसरू नये.. अगदी हेच मोबाईल मध्ये शब्द खड्गचे विशेष प्रतिनिधी द्वीप चेऊलकर यांनी टिपले आहे..
- द्वीप संतोष पूर्वा चेऊलकर. विशेष प्रतिनिधी शब्द खड्ग डिजिटल वृत्तपत्र..
Shabda Khadag © 2026. All Rights Reserved.
Developed By Vighnesh Technologies.