सर्वसामान्य माणसांना कुणी वाली राहिलेला नाही असे म्हटल्यास वावगे ठरू नये. स्वाभिमानी लोकांची नेहमीच समाजात कुचंबणा होते आणि लाळघोटी मंडळी सत्तेचा सोपान चढतात हे अगदी सर्वांनाच ठाऊक आहे.
याच संदर्भात आपल्या शब्द खड्ग डिजिटल वृत्तपत्राने सामान्य माणसांशी संवाद साधला. सर्वच सरकारी अधिकारी आणि पोलीस वाईट नसतात हे मत पाच टक्के लोकांनी मांडले. आणि उरलेल्या ९५ टक्के लोकांनी पोलीस, सरकारी अधिकारी, पत्रकार आणि राजकारण्यांची बेफाम टीका केली. आणि ही टीका लोकांची मते ऐकतांना वास्तवच वाटली.. दोन पाच टक्के राजकारणी सोडले तर बाकीचे सर्व बेशरम आणि मतं मागण्यापुरतेच असतात, एकदा गरज संपली की हे लोक नंतर पाच वर्ष विचारीत नाहीत हा सूर आळवतांना ज्याची सायकल घेण्याची लायकी नव्हती तो साधा नगरसेवक झाल्यावर गाडीतून फिरू लागतो. हा पैसा येतो कुठून हा लोकांचा प्रश्न आहे. मीडियाचं सुद्धा असंच आहे. दोन पाच पत्रकार सोडले तर बाकीचे राजकारणी आणि गुंडांच्या हाती विकले गेलेले आहेत. सरकारच्या विरोधात फार कमी पत्रकार बोलण्याचे धाडस दाखवितात.पैसे भेटले की हे लाचखाऊ पत्रकार गप्प बसतात. एपस्टीन फाईल बद्दल बोलण्याचे या हरामखोरांत धाडस नाही. व्यक्ती पूजा करण्यात यांना धन्यता वाटते. भारत विश्वगुरू आहे असा आणि प्रगतीचा खोटा प्रचार करण्यात मीडिया धन्यता मानीत आहे..
आता पोलिसांबद्दल बोलूयात काही पोलीस खूप चांगले आहेत मात्र बऱ्याच मोठ्या प्रमाणात इतर पोलीस त्यांच्याकडे गेलेल्यांना गुन्हेगाराच्या नजरेतून पाहतात. दोन शब्द धड बोलत नाहीत. यांच्या पेक्षा गुंड परवडले असे सुद्धा लोक बोलतांना बोलून गेले. या पोलिसांची दादागिरी फक्त सर्वसामान्य जनतेवर चालते राजकारणी आणि मोठाल्या गुंडांचे हे पोलीस तळवे चाटतात. लाच खाऊन गप्प बसतात असे लोक सर्रासपणे बोलतात. आणि म्हणून सीमेवर सैनिक मेला की देश हळहळतो. मात्र, पोलीस मेला की बरं झालं मेला अशी भावना आजही सर्वसामान्य लोकांमध्ये पाहायला मिळते.. माझे शब्द खड्ग मराठी, हिंदी, इंग्रजी वृत्तपत्राचा संपादक म्हणून अनेक पोलिसांशी चांगले संबंध आहेत. तरी सुद्धा एक स्पष्टपणे सांगतो की, काही मग्रूर पोलीस अधिकारी पत्रकार असून आम्हाला सुद्धा सहकार्य करीत नाहीत तर हे लोक गरिबांना काय विचारीत असतील..?? आणि काही सरकारी अधिकारी तर आपल्या पेक्षा इतर कुणीच शहाणं नाही या अविर्भावात वावरतात आणि मनमानी करतात.. इथे मला सर्वसामान्य लोकांचा खूप राग येतो. कारण या लोकांना आपल्या संविधानाने दिलेले अधिकार माहित नाहीत. आपण सरकारी कार्यालयांत, पोलीस स्टेशन मध्ये व्हिडिओ रेकॉर्डिंग करू शकतो आणि या लोकांना जाब विचारू शकतो हेच गरिबांना माहित नाही. हे लोक जनतेचे सेवक आहेत. किंमत यांना नाही तर यांच्या वर्दीला आहे आणि याचाच हे लोक गैरफायदा घेत आहेत. मस्तवाल अधिकाऱ्यांचा माज जनतेने एकत्र येऊन उतरवायला हवा..एकुणात काय तर पोलीस, सरकारी कर्मचारी, पत्रकार आणि राजकारण्यांबद्दल लोकांची मते अजिबातच चांगली नाहीत. खरे तर या लोकांना सर्वसामान्यांशी कसे बोलावे याचे सरकारने वर्ग भरवायला हवेत..आणि मस्तवाल लोकांना मग तो कुठल्याही क्षेत्रातला असो त्याला कायमचे घरी बसवायला हवे..
- प्रा. दिपक जाधव. संपादक शब्द खड्ग डिजिटल वृत्तपत्र..
Shabda Khadag © 2026. All Rights Reserved.
Developed By Vighnesh Technologies.