आपलं पोट भरलं म्हणजे झालं असं नाही..

मनातलं पान..

सामाजिक, राजकीय, पत्रकारिता, सांस्कृतिक आणि शैक्षणिक क्षेत्रांत वावरतांना माझ्या परिचयात येणारे नव्वद टक्के लोक आत्मकेंद्री आणि स्वतःच्या पोळीवर तूप ओढून घेणारे मी पाहतो आहे. बरे या लोकांना आपण त्यांच्या या स्वार्थी सवयी पासून परावृत्त करण्याचा प्रयत्न केल्यास त्यांना आपला राग येतो. जसे माझे भरते तसे माझ्या सोबत वावरणाऱ्या लोकांचे पोट भरणे सुद्धा गरजेचे आहे ही मानसिकता फार कमी लोकांमध्ये पाहायला मिळते आहे. माझेही माझे आणि तुझेही माझे अशी सध्याची अवस्था आहे. मी इतरांच्या प्रसिद्धीच्या लिहिलेल्या किंवा माझ्याकडून हक्काने लिहून घेतलेल्या कितीतरी बातम्यांचे माझ्या हक्काचे पैसे मला न देता त्या मध्यस्थांनीच ज्यांनी माझ्याकडून या बातम्या लिहून घेतल्या होत्या त्यांनी खाल्ले आहेत. माझ्या लक्ष्यात आल्यावर मग मी सावध झालो आणि वृत्तपत्र फुकट चालत नाही त्याला ही पैसे लागतात व हा माझा व्यवसाय असे असे ठणकावले. मला इथे असे सांगायचे आहे की फक्त आपणच शहाणे नाही आहोत. काही मंडळी मला उगीचच घाबरते. त्यांना वाटते की हा आपल्या सोबत आला तर हा आपली विकेट काढेल. कारण याचा पेपर आहे आणि हा फर्डा वक्ता आहे तसेच दिलदार आहे. मित्रांनो लोकांच्या नशिबाला कधीच आपले नशीब घासायचे नसते आणि लोकांची रेघ आपल्या पेक्षा मोठी असेल तर ती पुसत बसण्या पेक्षा आपली रेघ आपल्या मेहनतीने लांडीलबाडी न करता वाढविण्याचा प्रयत्न करायचा.. कुणाला पाण्यात पाहून अथवा कुणावर जळून आपण कधीच मोठे होत नाही..

- प्रा. दिपक जाधव. संपादक शब्द खड्ग डिजिटल वृत्तपत्र..

110

जाहिरात

ट्रेंडिंग बातम्या

Get In Touch

Dombivli

+91 9967872052

contact@shabdakhadag.in

Follow Us
लोकप्रिय बातम्या

Shabda Khadag © 2026. All Rights Reserved.

Developed By Vighnesh Technologies.