खूपसे कवी - लेखक कागदावर जबरदस्त लिहितात. अगदी वाचणाऱ्याच्या डोळ्यात अश्रू येतात. मात्र, प्रत्यक्षात यातील फार थोडे समाजाभिमुख असतात. कागदावर बोलबच्चन देणे आणि प्रत्यक्षात एखाद्या व्यक्तीला माणूस बनून मदत करणे हे फार थोड्या लोकांना जमते..
मानवी प्रवृत्ती अशी आहे की आपण दोन चेहरे घेऊन वावरत असतो एक आतला आणि एक बाहेरचा. त्यात बाहेरचा चेहरा फक्त बडेजाव मिरवायला असतो. लोकांना मी किती शहाणा की मी किती शहाणी आणि सुहृदय दे दाखवायला असतो. मात्र, आतला चेहरा तसाच प्रेमळ असेल हे ती व्यक्ती आणि तिचा अनुभव आलेलेच समजू शकतात.
कागदावर लाखाच्या बाता मारण्या पेक्षा एखाद्या गरजवंताचे आयुष्य उभे करून देता आले तर ते कागदावरच्या पोकळ शब्दांपेक्षा जास्त भरीव असेल असे माझे स्पष्ट मत आहे. कवी - लेखक ही फार वेगळी जमात आहे. स्वतःला भलतेच काही तरी समजणारी जमात. पण यांच्या शब्दाने आग लागावी, काही बदल व्हावेत अशी फार थोडीच मंडळी या क्षेत्रांत आहेत. आणि जे आहेत ते या तथाकथित शो- शायनर लोकांच्या टोळ्यांमध्ये सहभागी होत नाहीत. मी स्वतः कवी - लेखक असल्याने मला या कंपू शाहीचा वाईट अनुभव आला असल्याने आता पोकळ बाता मारण्यापेक्षा कुणासाठी तरी प्रत्यक्ष झिजायचे असे ठरविले आहे. आणि त्यानुसार गेली काही वर्ष सातत्याने जमेल तेवढी इतरांना मदत करीत आहे.. कविता - कवी आणि लेखक कधीच वाईट नाहीत. वाईट आहे तो माणूस न बनण्याचा यांच्यातील अनेकांचा अहंकार..
- प्रा. दिपक जाधव. संपादक शब्द खड्ग डिजिटल वृत्तपत्र..
Shabda Khadag © 2026. All Rights Reserved.
Developed By Vighnesh Technologies.