अनधिकृत पंप लावून पाणी उपसा करणाऱ्यांवर कारवाई; ५० हजारांचा दंड, नळजोडणीही खंडित होणार..

भाईदर महानगरपालिका जलवाहिन्यांवर अनधिकृतपणे मोटार किंवा पंप बसवून पाणी उपसा करणाऱ्यांवर आता कडक कारवाई करण्यात येणार आहे..

मीरा-भाईंदर : भाईदर महानगरपालिका जलवाहिन्यांवर अनधिकृतपणे मोटार किंवा पंप बसवून पाणी उपसा करणाऱ्यांवर आता कडक कारवाई करण्यात येणार आहे. अशा नळजोडण्यांची तपासणी करण्यासाठी महानगरपालिका प्रशासनाकडून विशेष पाहणी मोहीम राबविण्यात येणार असल्याची माहिती पाणीपुरवठा व मलनिःसारण विभागाने दिली. क्षेत्रातील

शहरातील काही इमारती, बंगले, रो-हाऊस, वैयक्तिक घरे, चाळी तसेच अन्य मालमत्तांवरील अधिकृत नळजोडण्यांवर अनधिकृतपणे मोटार किंवा पंप बसवून थेट वितरण जलवाहिनीतून मोठ्या प्रमाणात पाणी उपसा केला जात असल्याचे प्रशासनाच्या निदर्शनास आले आहे. या प्रकारामुळे पाण्याचा दाब आणि प्रवाह असंतुलित होऊन परिसरातील इतर नागरिकांना पुरेशा दाबाने पाणी मिळत नाही. परिणामी, समान पाणी वितरणावर परिणाम होऊन कृत्रिम पाणीटंचाई निर्माण होते.

तपासणीदरम्यान अनधिकृत मोटार किंवा पंप आढळल्यास तो जप्त करून संबंधितांना ५० हजार रुपयांचा दंड ठोठावण्यात येणार आहे. तसेच संबंधित नळजोडणी खंडित करण्याची कारवाईही केली जाणार आहे. अनधिकृत पाणी उपसा हा दुसऱ्यांच्या पाणीहक्कावर परिणाम करतो. नागरिकांनी पाणी बचत करून समान वितरणास सहकार्य करावे, असे आवाहन कार्यकारी अभियंता शरद नानेगवकर यांनी केले आहे.

74

जाहिरात

ट्रेंडिंग बातम्या

Get In Touch

Dombivli

+91 9967872052

contact@shabdakhadag.in

Follow Us
लोकप्रिय बातम्या

Shabda Khadag © 2026. All Rights Reserved.

Developed By Vighnesh Technologies.