उगीचच कुणालाही डोक्यावर बसवू नका..

शब्द खड्ग.. रोखठोक.. 

होतं काय की आपण अतिशय प्रामाणिकपणे एखाद्याची मदत करायला जातो आणि त्याला प्रोत्साहन द्यावे या उद्देशाने तो कमकुवत असला तरी त्याला डोक्यावर बसवतो. अर्थात त्याला उत्तेजन देतो. मात्र, काही मंडळी यातून चांगला बोध घेतात व स्वतःची अगदी छान प्रगती करतात.. आणि काही मंडळी हरभऱ्याच्या झाडावर चढतात आणि ज्याने हात दिलाय त्यालाच लाथ देतात.. काही मंडळींना गरज लागल्यावरच आपली आठवण येते. म्हणून गरजेपुरती आपली आठवण काढणाऱ्या लोकांना कधीच गांभीर्याने घेऊ नका. जे लोक त्यांचे काही काम नसतांनाही केवळ आपल्या प्रेमापोटी आपल्याशी नियमित बोलतात तथा आपल्या संपर्कात राहतात अशा  व्यक्तींसाठी आपल्याला रात्रीचा दिवस करावा लागला तरी मागेपुढे पाहू नका. कारण अशाच व्यक्ती आपल्या जिवाभावाच्या असतात.. 

- प्रा. दिपक जाधव. संपादक शब्द खड्ग डिजिटल वृत्तपत्र..

122

जाहिरात

ट्रेंडिंग बातम्या

Get In Touch

Dombivli

+91 9967872052

contact@shabdakhadag.in

Follow Us
लोकप्रिय बातम्या

Shabda Khadag © 2026. All Rights Reserved.

Developed By Vighnesh Technologies.