गोड बोलून टाळण्यापेक्षा कडू बोला पण मेहनतीचे पैसे द्या..

मनातलं पान.. 

हल्ली लोकांना काय झालंय कळायला मार्ग नाही.. लोक सगळंच फुकटात पदरात पाडून घ्यायला बघतात. माझ्या आजूबाजूला मी रोज असे कितीतरी नग बघतो की जे खूप गोड बोलतात आणि शिवाजी सर मी तुमच्या बरोबरच आहे असे ही बोलतात. मात्र, पैसे देण्याची वेळ आली की मागे पळून जातात. बरं आपण त्यांना पैशाचे स्पष्टपणे सांगितले की मग या लोकांना  आपला राग येतो व हे लोक आपली मैत्री तोडतात. मित्रांनो आपल्याला सगळ्याच गोष्टी विनामूल्य भेटाव्यात ही अपेक्षा करणेच मुळात चूक आहे. समाजात वावरताना, मल्टिनॅशनल कंपनीत काम करतांना आणि शब्द खड्गचा व्यवस्थापक म्हणून काम करताना या गोष्टी मी रोज बघत आहे. व रोज नवा अनुभव घेत आहे. कुणी हे पर्सनल घेऊ नका, कुणाला दुखविण्याचा माझा हेतू नाही. मात्र, शेवटी एकच सांगावेसे वाटते की, आपल्याला जसा खर्च असतो ना तसाच तो समोरच्यालाही असतो याचा आपण थोडातरी विचार करायलाच हवा.. 

- शिवाजी जाधव. व्यवस्थापक / विशेष प्रतिनिधी शब्द खड्ग डिजिटल वृत्तपत्र..

68

जाहिरात

ट्रेंडिंग बातम्या

Get In Touch

Dombivli

+91 9967872052

shabda.khadag@gmail.com

Follow Us
लोकप्रिय बातम्या

Shabda Khadag © 2026. All Rights Reserved.

Developed By Vighnesh Technologies.