माझा बाप्पा.. श्रीमती अलका अशोक बिर्जे यांचा विजयदुर्ग चा राजा..

देवगड पासून पंधरा सोळा किलोमीटर असलेल्या विजयदुर्ग येथील श्रीमती अलका अशोक बिर्जे यांचा गणपती बाप्पा भाविकांचे लक्ष वेधून घेत आहे..

रत्नागिरी- सिंधुदुर्ग म्हणजे श्री गणेशाचा आगळा वेगळा महोत्सव धुमधडाक्यात साजरे करणारे जिल्हे.. गणपती बाप्पा आणि होळी येथील अतिशय सुप्रसिद्ध सण  मुंबईचे चाकरमानी अगदी काहीही झाले तरी गणपतीला कोकणात जातातच.. पारंपारिकतेने नटलेला अलका बिर्जे यांचा गणपती बाप्पा घरात मंगलमय वातावरण निर्मिती करीत आहे. धूप अगरबत्तीचा सुवास आणि आरती भजनाचा गजर.. बाप्पाला दाखविला जाणारा नैवेद्य आणि बाप्पासाठी बनविलेला खास घरगुती  फराळ या गोष्टी इथे खूप महत्वाच्या मानल्या जातात.. बिर्जे यांच्या बाप्पाला अलका ताई बिर्जे, मनोहर विश्वनाथ बिर्जे, सचिन बबन बिर्जे, आकांक्षा बिर्जे, नेहा बिर्जे, माधवी मनोहर बिर्जे, भूमी बिर्जे आणि बिर्जे कुटुंबीयांतील सर्व लहान थोर बाप्पाची मनोभावे पूजा अर्चना करतात.. 

- प्रा. दिपक जाधव. संपादक शब्द खड्ग डिजिटल वृत्तपत्र..

114

जाहिरात

ट्रेंडिंग बातम्या

Get In Touch

Dombivli

+91 9967872052

shabda.khadag@gmail.com

Follow Us
लोकप्रिय बातम्या

Shabda Khadag © 2026. All Rights Reserved.

Developed By Vighnesh Technologies.