शब्द खड्ग डिजिटल वृत्तपत्राने घेतलेला आढावा..
सध्या आपले सणवार अत्यंत आधुनिक आणि बाजारू झालेले आहेत असे आपल्याला वाटते का ? आणि सणावाराच्या पारंपरिक संस्कृतीचे बारा वाजले आहेत असे आपल्याला वाटते का ? हा प्रश्न आपल्या शब्द खड्गने सर्वसामान्य लोकांना विचारला असता लोकांनी खूप रोखठोक मते मांडली.
पुण्यातील सामाजिक कार्यकर्ते तथा ध्वनी प्रदूषणावर आवाज उठविणाऱ्या विद्यानंद बापट यांना नुकतीच पुण्यात मारहाण झाली. या प्राश्वभूमीवर डीजे आणि कर्णकर्कश ढोलताशे हे सणांना आणि आपल्या संस्कृतीला हरताळ फासत आहेत असे लोकांनी स्पष्टपणे सांगितले.. आपली संस्कृती आणि परंपरा सणवार जोपासण्याची आणि सर्वांना एकत्र घेऊन आनंदोत्सव साजरी करण्याची असली तरी पूर्वी असलेली त्यातील सात्विकता आता हरवली आहे. व वर्गणी रुपी खंडणी गोळा करून एकूणच वातावरण आणि सण विद्रुप केले जात आहेत असे लोकांचे रोखठोक म्हणणे आहे. अगदी कुठलाच सण उत्सव गोगाटाचा असू नये असे सांगतांना लहान मुले, वृद्ध तथा आजारी माणसांना या गोंगाटाचा खूप त्रास होतो. यात उडविल्या जाणाऱ्या फटाक्यांमुळे वायू प्रदूषण होते तर गोगाटाने ध्वनी प्रदूषण होते.. थोडक्यात काय तर सण हे पारंपरिक आणि सणांसारखेच साजरे व्हावेत. तुमचा आनंद जर इतरांच्या जीवावर उठत असेल तर त्या आनंदाला लगाम घाला असे लोकांनी स्पष्टपणे सांगितले..
- प्रा. दिपक जाधव संपादक शब्द खड्ग डिजिटल वृत्तपत्र..
Shabda Khadag © 2026. All Rights Reserved.
Developed By Vighnesh Technologies.