आपण तीन उपसंपादक आणि वृत्तसंपादक इत्यादी पदांबरोबरच आपल्या शब्द खड्ग चॅनल साठी वृत्तनिवेदक होण्याची संधी देत आहोत..
शब्द खड्गच्या वाचकांना तथा होतकरू व हितचिंतकांना शब्द खड्ग सोबत काम करण्याची सुवर्ण संधी..
मित्रांनो येत्या 15 ऑगस्ट 2026 ला आपल्या वृत्तपत्राला बारा वर्ष पूर्ण होत आहेत.. या बारा वर्षांत वृत्तपत्राने खूप चढ उत्तर पहिले. कोरोना नंतर आपण आपले वृत्तपत्र डिजिटल स्वरूपात मराठी, हिंदी, इंग्रजी भाषेत प्रकाशित करू लागलो. येत्या काळात आपण तीन उपसंपादक नेमणार आहोत. त्यात एक स्पोर्ट बीट बघेल, एक वैद्यकीय बातम्या कव्हर करेल आणि एक शाळा कॉलेज कव्हर करेल.. त्याच बरोबर वृत्तसंपादक, विशेष प्रतिनिधी, फोटोग्राफर, महाराष्ट्र विशेष प्रतिनिधी अशी पद सुद्धा आपण देणार आहोत. आपण कुणालाच कसलेच मानधन देणार नाही. आपण होतकरूंना शिकण्याची संधी उपलब्ध करून देत आहोत. मात्र, तुम्ही दिलेली बातमी तुमच्याच नावासह प्रकाशित केली जाईल. आणि याच गोष्टीचा तुम्हाला जास्त फायदा होणार आहे.
प्रेस चे आयकार्ड शब्द खड्गसाठी काहीच काम न करता फक्त शोभेसाठी घेणार असाल तर आमच्याकडे येऊच नका. आणि जो प्रामाणिकपणे काम करेल शब्द खड्ग वृत्तपत्राला आथिर्क फायदा करून देईल त्यालाच आम्ही प्रकाशात आणू आणि वेगवेगळ्या संधी देऊ कृपया याची नोंद घ्या.. वृत्तपत्रासाठी काहीच न करणाऱ्यांची आयकार्ड मुळीच रिन्यू केली जाणार नाहीत. शब्द खड्ग ला प्रामाणिक आणि मेहनती लोक हवे आहेत..
आमच्या सोबत काम करू इच्छिणाऱ्यांनी शब्द खड्गचे व्यवस्थापक शिवाजी जाधव फोन नंबर - 9004494231 आणि शब्द खड्गचे फोटोग्राफर दिनकर सोमासे फोन नंबर - 7977921599 यांच्याशी संपर्क साधावा..
- प्रा. दिपक जाधव. संपादक शब्द खड्ग डिजिटल वृत्तपत्र..
Shabda Khadag © 2026. All Rights Reserved.
Developed By Vighnesh Technologies.