हात तुझा हातात..

एखाद्याचा प्रामाणिक हात आणि साथ लाभायला सुद्धा मोठे भाग्य लागते. हात आणि साथ या गोष्टी एका नाण्याच्या दोन बाजू आहेत. या गोष्टी एकमेकांपासून कधीच वेगळ्या होऊन स्वतःचं अस्तित्व दाखवू शकत नाहीत..

जे मनाने खूप चांगले असतात तेच अशी नाती जोपासून शेवटच्या श्वासापर्यंत टिकवून ठेवतात. काही मंडळी आम्ही तुमच्या सोबत आहोत असा फक्त भास निर्माण करतात. मात्र, वेळ आल्यावर काहीबाही कारणे सांगून आपल्या पासून दूर पळून जातात. या अशा लोकांच्या मनात नेहमीच चोर असतो. अरे याला कळले तर, त्याला कळले तर अशी यांच्या मनात सतत भीती असते. मैत्री असो अथवा प्रेम असो.. प्यार किया तो डरना क्या.. आणि दोस्ती के लिये जान हाजीर.. असा स्वभाव आता दुर्मिळ होत चालला आहे. खूप साऱ्या गोष्टी पडद्यामागून आपल्या आयुष्यात घडत असतात. पण त्या घडतांना देखील आपण एकमेकांना विश्वासात घेणे गरजेचे असते. हल्ली नाती तकलादू झालेली असतांना जर तुम्हाला कुणी आधार देणारा मित्र मैत्रीण भेटत असेल तर अशा लोकांना सांभाळून ठेवा. खूपदा रक्ताची नाती सुद्धा आपल्याला विचारीत नाहीत. अशा वेळी आपल्याला जीव लावणारी माणसे आपल्या पाठी ठामपणे उभी राहतात..

- प्रा. दिपक जाधव. संपादक शब्द खड्ग डिजिटल वृत्तपत्र..

318

जाहिरात

ट्रेंडिंग बातम्या

Get In Touch

Dombivli

+91 9967872052

shabda.khadag@gmail.com

Follow Us
लोकप्रिय बातम्या

Shabda Khadag © 2026. All Rights Reserved.

Developed By Vighnesh Technologies.