विश्वास असला की नाती टिकतात..

मैत्री आणि अगदी कुठल्याही नात्यात विश्वासाबरोबरच त्या नात्याला वेळ सुद्धा द्यायला हवा.. 

गोष्ट तशी साधीशीच पण तरी डोंगरा एवढी.. आज मंगळवार दिनांक 23 जून 2026 रोजी माझे परममित्र आणि आपल्या शब्द खड्गचे वेब डेव्हलपर कंजुल खरे यांना त्यांच्या ऑफिस मध्ये भेटलो. कारण काय की गेल्या आठ दिवसांपूर्वी त्यांनी आपण जे आपलं मराठी, हिंदी आणि  इंग्रजीत अगदी चोवीस तास चालणारं शब्द खड्ग डिजिटल वृत्तपत्र आणि गुगलला काही टेक्निकल गोष्टींसाठी आणि इतर डिजिटल वृत्तपत्र संदर्भात असलेल्या कामांसाठी पैसे भरावे लागतात ते भरण्यासाठी कंजुल यांची भेट घेतली.  झाले असे की, मी माझ्या वैयक्तिक कामांत खूप बिझी असल्याने कंजुलजींनी या सर्व टेक्निकल कामांसाठीचे  मला भरावयाचे असलेले 40 हजार रुपये स्वतः भरले. अर्थात कंजुलजी सुद्धा त्यांच्या कामांत खूप बिझी असतात तरीही त्यांनी न विसरता हे पैसे भरले. आणि चकार शब्दाने सुद्धा मला पैशांबद्दल बोलले नाहीत. जेव्हा मी विचारले तेव्हा मला कळले. मग मी त्यांनी भरलेले पैसे त्यांना द्यायला त्यांच्या मागेच लागलो. मात्र, रोज डोंबिवली बाहेर त्यांच्या कामासंदर्भात मिटिंग सुरु असल्याने आमची भेट होत नव्हती. आणि कंजुलजी तरी सुद्धा त्यांनी भरलेल्या पैशांबद्दल काहीच बोलत नव्हते. मग आज त्यांना माझ्यासाठी वेळ काढाच म्हटलं आणि त्यांना भेटून त्यांनी शब्द खड्ग साठी भरलेले पैसे त्यांना दिले. 

प्रश्न पैशाचा नाही. प्रश्न विश्वासाचा आहे. आमचा दोघांचाही एकमेकांवर विश्वास आहे आणि कंजुलजी अर्ध्यारात्री उठून माझी अडलेली टेक्निकल कामे करून देतात. नाती टिकवायची असतील तर संवाद दोन्ही बाजूने होणे गरजेचे असते. एकानेच बोलत रहायचे आणि दुसऱ्याने सतत टाळत रहायचे असे करून जमत नाही. 

आणि आणखी एक महत्वाचा मुद्दा असा की, आपल्याला कुणी काहीही फुकटात देत नाही मात्र, माझ्या संपर्कातले खूपसे लोक त्यांच्या बातम्या आणि त्यांची प्रसिद्धी फुकटात करा असे म्हणतात. मला अशा लोकांचा हल्ली प्रचंड राग येतोय. मी यांना सगळं फुकटात का आणि कशाला द्यायचं ?? मला सगळीकडे पैसे भरावे लागतात आणि या फुकट्यांना मी फुकटात सगळं देऊ हे तुम्हाला तरी पटण्यासारखं आहे काय ? असो..

आणि  म्हणूनच मी वारंवार म्हणतोय ना की, मैत्री आणि अगदी कुठल्याही नात्यात विश्वासाबरोबरच त्या नात्याला वेळ सुद्धा द्यायला हवा तरच ते नातं टिकतं आणि बहरतं सुद्धा.. 

- प्रा. दिपक जाधव. संपादक शब्द खड्ग डिजीटल वृत्तपत्र..

95

जाहिरात

ट्रेंडिंग बातम्या

Get In Touch

Dombivli

+91 9967872052

contact@shabdakhadag.in

Follow Us
लोकप्रिय बातम्या

Shabda Khadag © 2026. All Rights Reserved.

Developed By Vighnesh Technologies.