स्मार्ट मीटर काढून टाकण्याची मागणी जोर धरू लागली आहे..

दहा बारा हजार रुपये पगार असलेल्या सर्वसामान्य माणसांना जर महिन्याला तीन चार हजार रुपये बिल येत असेल व ज्यांच्याकडे एसी आहे अशा लोकांना महिन्याला दहा हजाराच्या पुढे बिल येत असले तर आता अगोदरच सर्वच बाबतीत सरकारने वाढवून  ठेवलेल्या महागाईत लोकांनी जगायचं कसं असा प्रश्न सर्वसामान्य लोक सरकारला आणि वीजमंडळाला विचारीत आहेत..

याच संदर्भात शब्द खड्गने विद्युत विभागातील कर्मचाऱ्यांना छेडले असता त्यांनी नाव न छापण्याच्या अटीवर असे सांगितले की, अदानी आणि इतर भांडवलदारांच्या घशात सरकारने वीज घातलेली आहे. बिल वाढविणारे आम्ही कोण आहोत. आम्हाला जसे वरून आदेश येतात तसे आम्ही पगारी नोकरदार असल्याने आम्हाला वागावेच लागते. डोंबिवलीत भाजपने लोकाग्रहास्तव वीजमंडळात आंदोलन केले तेव्हा येथील कर्मचारी खाजगीत म्हटले की, हे स्मार्ट मीटर लावण्याचे काम तुमच्याच भाजप सरकारने केले आहे. अंबरनाथ मध्ये तर एका नगरसेवकाने व त्याचे भावाने वीज कर्मचाऱ्यांना ठोकून काढले आहे. रोज कल्याण- डोंबिवली, ठाणे, बदलापूर, अंबरनाथ इत्यादी शहरांत स्मार्ट मीटर काढून टाका बिल जास्त येते म्हणून आंदोलने होत आहेत. सरकारने सोलर पॅनलला प्रोत्साहन द्यावे अशी मागणी जोर धरत आहे. तर दुसरीकडे काही सोसायट्या स्मार्ट मीटर लावण्यास येणाऱ्या वीज मंडळाच्या कर्मचाऱ्यांना हाकलून देत आहेत. तात्पर्य काय तर स्मार्ट मीटर त्वरित काढून टाकावेत नाहीतर गोरगरीब वीजबिल भरताना कर्जबाजारी होतील.. 

- प्रा. दिपक जाधव. संपादक शब्द खड्ग डिजिटल वृत्तपत्र..

58

जाहिरात

ट्रेंडिंग बातम्या

Get In Touch

Dombivli

+91 9967872052

contact@shabdakhadag.in

Follow Us
लोकप्रिय बातम्या

Shabda Khadag © 2026. All Rights Reserved.

Developed By Vighnesh Technologies.