माझी फोटोग्राफी.. डोक्यावर आग ओकणारा सूर्य आणि पोटात भुकेची आग..

जगणं म्हणावं तितकं सोपं नाही.. जगण्याची लढाई रोज लढावी लागते आहे.. एकवेळ सूर्य चंद्र उगवणे थांबेल पण पोटातली भूक कशी थांबवणार..??

निसर्गाचा समतोल माणसानेच बिघडविला असल्याने, कधी धार्मिकतेच्या तर कधी नवनिर्माणाच्या नावाखाली झाडांची सतत कत्तल सुरु आहे.. गेल्या काही वर्षांत उन्हाचे प्रमाण प्रचंड वाढले आहे.. माणसाने अजूनही सावरायला हवे.. ऊन कीतीही वाढले तरी पोटासाठी कामकाज करावे लागतेच..भाकरीला  ऊन वारा पाऊस ठाऊक नसते..  डोंबिवली पश्चिमेच्या बावन्नचाळ परिसरातील उन्हाचे आणि तरीही त्यातून मार्गक्रमण करणाऱ्या  फेरीवाले आणि वाहनचालकांचे आपल्या मोबाइल मध्ये फोटो टिपले आहेत शब्द खड्गच्या व्यवस्थापिका आणि विशेष प्रतिनिधी सौ. साईली बनसोडे यांनी.. निसर्गाचा समतोल असाच बिघडत राहिला आणि बेमोसमी पाऊसही पडत राहिला तर एक दिवस अनर्थ घडल्या शिवाय राहणार नाही.. 

- सौ. साईली बनसोडे. व्यवस्थापिका / विशेष प्रतिनिधी. शब्द खड्ग डिजिटल वृत्तपत्र..

95

जाहिरात

ट्रेंडिंग बातम्या

Get In Touch

Dombivli

+91 9967872052

contact@shabdakhadag.in

Follow Us
लोकप्रिय बातम्या

Shabda Khadag © 2026. All Rights Reserved.

Developed By Vighnesh Technologies.