शब्द खड्ग वृत्तपत्राची स्थापना संस्थापक - मुख्य संपादक प्रा. दिपक संभाजी जाधव यांनी १५ ऑगस्ट २०१४ रोजी डोंबिवली ( मुंबई / महाराष्ट्र ) येथे केली. सुरुवातीला शब्द खड्ग साप्ताहिक प्रिंट स्वरूपात निघत होते. आपला RNI म्हणजे रजि.नंबर.MHAMAR/2014/57786 हा आहे. मात्र, मधल्या काळात कोरोनाचे संकट आल्याने अगदी सगळ्याच व्यवसायांवर कोरोनाचे वाईट सावट पडल्याने आपला प्रिंट स्वरूपात निघणारा शब्द खड्ग पेपर नैसर्गिक मजबुरी मुळे प्रिंट करण्यास थांबवावा लागला. मग धावत्या जगासोबत धावतांना, चालतांना स्पर्धेत आपण कुठेच मागे पडू नये म्हणून ३० जुलै २०२३ रोजी शब्द खड्ग वृत्तपत्र मराठी, हिंदी आणि इंग्रजी भाषेत डिजिटल स्वरूपात रोज अगदी दिवसाचे चोवीस तास गुगलच्या माध्यमातून ऑनलाईन प्रकाशित होऊ लागले. केंद्र सरकारच्या वृत्तपत्र विभागाकडे आपली नियमानुसार नोंदणी आहे. त्याच प्रमाणे आपली गुगल कडे सुद्धा नियमानुसार नोंदणी आहे. आपलं वृत्तपत्र कायद्याला धरून आणि वृत्तपत्राच्या आखून दिलेल्या नियमानुसारच चालते.. त्याच बरोबर आपला उद्यम नोंदणी क्रमांक : UDYAM-33-0820397 हा आहे.
या वृत्तपत्रात रोजच्या सर्वांगीण बातम्या, महाराष्ट्र तथा भारतातील सर्व राज्य, देश विदेश, समाजकारण, राजकारण, अर्थकारण, गुन्हे, क्रीडा, व्यापार, शेती, आरोग्य, रेसिपी, सांस्कृतिक, वैज्ञानिक, शैक्षणिक, व्यक्ती तथा संस्थांची माहिती, कथा, कविता, वेगवेगळ्या विषयांवरील सदरे, संपादकीय, मनातले पान, गाणी, जावे म्हणींच्या गावा, माझी फोटोग्राफी, जुन्या नव्या मंडळींना विविध विषयांवर लिहिण्याची संधी, चर्चा सत्रे आणि फक्त इतकेच नाही तर आपल्या शब्द खड्ग लाईव्ह चॅनेलच्या माध्यमातून आपण मोबाईल आणि कॅमेऱ्याच्या सहाय्याने शूटिंग करून ते लिंक स्वरूपात दाखवितो. तात्पर्य काय तर शब्द खड्ग लेखी आणि दृक-श्राव्य माध्यमातून सुद्धा रोज आपल्या भेटीस येते.
या वृत्तपत्राचे वेब डेव्हलपर तथा आपले विशेष प्रतिनिधी असलेले कंजुल खरे.. हे आहेत तर, व्यवस्थापक तथा विशेष प्रतिनिधी शिवाजी जाधव आणि सौ. साईली सुनिल बनसोडे आणि सुनिल सीताराम बनसोडे हे आहेत. शब्द खड्ग डिजिटल वृत्तपत्राचे महाराष्ट्र विशेष प्रतिनिधी म्हणून संजय खडपे आहेत. तर, विशेष प्रतिनिधी म्हणून बाबुराव संभाजी जाधव, लता जाधव, रमेश गभाले, अश्विन केळकर, व्यंकटेश नायडू, दिनकर सोमासे, मकरंद खाडे (विशेष प्रतिनिधी / कॅमेरामन ) जय डगळे ( विशेष प्रतिनिधी / कॅमेरामन, रशिया ) इत्यादी मंडळी आपले योगदान देत आहेत. काही विद्यार्थी आणि हौशी स्त्री - पुरुष शब्द खड्ग डिजिटल वृत्तपत्रात प्रत्यक्ष अनुभव घ्यायला येतात आणि जातात. शब्द खड्ग फक्त भारत देश अथवा महाराष्ट्र अथवा मुंबई आणि भारतातील राज्यच नाही तर जागतिक पातळीवर चालणाऱ्या सर्वच घडामोडींचा मराठी, हिंदी आणि इंग्रजीत मागोवा घेत आहे.. शब्द खड्गच्या माध्यमातून आपण नव्या जुन्या मंडळींसाठी काव्योत्सव, गाण्यांचे कार्यक्रम, कथाकथन, महिलांसाठी, विद्यार्थ्यांसाठी विविध स्पर्धा आणि कार्यक्रम, व्याख्याने, चर्चासत्र, लेखन - दिग्दर्शन, मुलाखत तंत्र, सूत्रसंचालन, बातमी कशी लिहावी, वाचावी, लघुपट निर्मिती, अभिनय, लेखन कार्यशाळा, आरोग्य शिबिरे, माध्यम प्रायोजक कार्यक्रम, समाजसेवा उपक्रम, किन्नर तथा विधवा महिलांसाठी कार्यक्रम, फॅशन शो, हळदीकुंकू, शॉर्ट फिल्म फेस्टिवल, हिंदी, मराठी फिल्म, वेब सिरीज, पोलिसांसाठी नियमित विविध उपक्रम, पथनाट्य.. असे अनेक कार्यक्रम सतत राबवित असतो.. आणि कायमच वेगवेगळे उपक्रम राबवू.. आपल्या सोबत मैत्रेय प्रॉडक्शन आणि लिपिका एंटरटेन्मेंट हे कायम आहेत.. कायदेशीर बाबींसाठी सुद्धा आपण वेळोवेळी वकिलांचा सल्ला घेत असतो. आपण सरकारने व वृत्तपत्र तथा डिजिटल माध्यमाने आखून दिलेल्या नियमानुसारच वाटचाल करीत आहोत. आपल्या एखाद्या बातमीवर जर काही कायदेशीर कारवाई झालीच तर ती कल्याण सत्र न्यायालयाच्याच कार्यक्षेत्रात असेल याची आपण सर्वांनी नोंद घ्यावी. शब्द खड्ग आता प्रिंटिंग स्वरूपात निघत नसल्याने RNI नंबर आणि आपला तसा अर्थाअर्थी संबंध नाही. डिजिटल वृत्तपत्राला उद्यम नोंदणी आवश्यक आहे व ती आपण केलेली आहे. आपण गुगल ला सुद्धा वृत्तपत्र चालविण्यासाठी लागणाऱ्या इतर काही गोष्टींसाठी चार्जेस देत असल्याने आपण सर्व काही नियमानुसारच करीत असल्याची आपण खात्री बाळगावी..
शब्द खड्ग वृत्तपत्रात संस्थापक / मुख्य संपादक प्रा. दिपक संभाजी जाधव आणि व्यवस्थापक/ विशेष प्रतिनिधी असलेले शिवाजी जाधव, सौ, साईली बनसोडे आणि सुनिल बनसोडे हे चौघे वगळता इतर कुणीच कायमचे प्रतिनिधी नाहीत याची नोंद घ्यावी. आपण शिकाऊ पत्रकार, पत्रकार, उपसंपादक, विशेष प्रतिनिधी, महाराष्ट्र विशेष प्रतिनिधी, कॅमेरामन अथवा इतर छोटी मोठी पदे एक वर्षासाठी नेमत आहोत व तशीच कायम नेमू याची नोंद घ्यावी. शब्द खड्ग डिजिटल वृत्तपत्रात येणारे लोक स्वखुशीने शिकायला मिळते या इराद्याने काही काळ येत असल्याने शब्द खड्ग डिजिटल वृत्तपत्र व त्याचे संस्थापक / मुख्य संपादक प्रा. दिपक संभाजी जाधव हे कुणालाही मानधन अथवा कसलाही पगार देण्यास बांधील नाहीत याची नोंद घ्यावी. शब्द खड्ग डिजिटल वृत्तपत्राच्या म्हणजे प्रेस असे लिहिलेल्या आपल्या ओळखपत्राचा कुणी गैरवापर करीत असेल अथवा केल्यास अशा व्यक्तीवर कायदेशीर कारवाई करण्याचा व पोलिसांत, न्यायालयात गुन्हा नोंदविण्याचा अधिकार शब्द खड्गच्या संपादकांना आहे व अशा व्यक्तीचे ओळखपत्र त्वरित रद्द केले जाईल याची सुद्धा नोंद घ्यावी..
आमच्या शब्द खड्ग वृत्तपत्रासोबत काम करावयाचे असल्यास आपण आमच्याशी संपर्क साधावा, आमच्या परिवारात आपले हार्दिक स्वागत आहे..
E-mail : shabda.khadag@gmail.com
वेब साईट : shabdakhadag.in
- प्रा. दिपक संभाजी जाधव..
संस्थापक / मुख्य संपादक शब्द खड्ग मराठी, हिंदी, इंग्रजी डिजिटल वृत्तपत्र..
आणि शब्द खड्ग लाईव्ह युट्युब चॅनेल..
फोन नंबर - 9967872052
Shabda Khadag © 2026. All Rights Reserved.
Developed By Vighnesh Technologies.