आनेवाला पल जानेवाला है..

मित्रांनो काही मंडळी आजचं काम उद्यावर लोटतात.. एवढी काय घाई आहे असं म्हणून हातातली सोन्यासारखी वेळ उगीचच दवडतात. तर आमच्यासारखी काही मंडळी उद्याचा आणि नंतरचा विचार न करता हातातली वेळ मनमुराद जगण्याचा प्रयत्न करतात..

वेळ कधीच कुणासाठी थांबत नाही.. आणि परिस्थिती सुद्धा तशीच राहत नाही ती सुद्धा बदलतेच. आज ऊन असेल तर उद्या नक्कीच सावली येते. थोडक्यात काय तर आयुष्य सुख दुःखाचा खेळ आहे. पण न डगमगता त्यातून मार्गक्रमण करायचं असतं.. थांबला तो संपला.. आणि हल्ली कुणाला एखादी चांगली गोष्ट दहादा सांगून सुद्धा तो अथवा ती ऐकत नसेल तर अशा व्यक्तीला अर्ध्यावर सोडून आपण पुढे निघून जायचं. दुनियेचा विचार करीत बसलं तर आपलं जगणं कठीण होईल आणि म्हणूनच नेहमी लक्षात ठेवायचं की वाईट वेळ कधीच कायम थांबत नाही. म्हणून स्वतःही जगा आणि आपल्या संपर्कातील लोकांनाही जगू द्या.. 

- प्रा. दिपक जाधव. संपादक शब्द खड्ग डिजिटल वृत्तपत्र..

318

जाहिरात

ट्रेंडिंग बातम्या

Get In Touch

Dombivli

+91 9967872052

shabda.khadag@gmail.com

Follow Us
लोकप्रिय बातम्या

Shabda Khadag © 2026. All Rights Reserved.

Developed By Vighnesh Technologies.