आयुष्यात एक तरी चांगला छंद जोपासा..

याची त्याची उठाठेव करण्या पेक्षा आणि नाहक कुठल्याही वाईट संगतीत आणि व्यसनांच्या आहारी जाण्या पेक्षा कुठला तरी चांगला छंद जोपासणे कधीही उत्तमच.. 

याला काय वाटेल त्याला काय वाटेल या भीतीने आणि समाजाच्या लाजेने खूप लोक स्वतःचे छंद आतल्या आत मारून टाकतात.. आपण जर काही चांगले करतो आहोत तर कुणाच्याच बापाला घाबरण्याची गरज नाही. जे लोक अश्लील आणि लोकांना फसविणारे कृत्य करतात त्यांच्या मनात चोर असतो. जे प्रामाणिक असतात त्यांना कुणाला घाबरण्याची गरजच पडत नाही.. छंद आयुष्य फुलवतात, जगण्याला प्रेरणा देतात, तना- मनाला कधी एकटे पडू देत नाहीत. छंदामुळे चांगल्या माणसांच्या ओळखी होतात आणि आणखी काहीतरी नवनवे करीत राहण्याची ऊर्जा मिळते.. मानवी आयुष्य एकदाच मिळत असल्याने आयुष्य जसे समोर येईल तसे त्याला भिडत चला आणि आपल्या कामात कितीही व्यस्त असलात तरी कुठला तरी चांगला छंद जोपासा आणि जन्माला आल्याचा काहीतरी फायदा घ्या.. 

- प्रा. दिपक जाधव. संपादक शब्द खड्ग डिजिटल वृत्तपत्र..

206

जाहिरात

ट्रेंडिंग बातम्या

Get In Touch

Dombivli

+91 9967872052

shabda.khadag@gmail.com

Follow Us
लोकप्रिय बातम्या

Shabda Khadag © 2026. All Rights Reserved.

Developed By Vighnesh Technologies.