शब्द खड्गच्या मंचावर आम्ही गेला आठवडाभर हा प्रश्न सर्वसामान्य लोकांसमोर मांडीत आहोत.. या प्रश्नावर लोकांनी खूपच रोखठोक प्रतिक्रिया नोंदविल्या आहेत त्याचा गोषवारा इथे मांडीत आहोत..
मुळात पत्रकारिता निपक्षपाती असावी असा लिखित आणि अलिखित नियम आहे. मात्र, बोटावर मोजणारे पत्रकार वगळता फार मोठ्यासंख्येने पत्रकार पैसे घेऊन मोदींनी न केलेली कामे सतत प्रेक्षकांच्या माथी मारीत आहेत आणि बहुजनांच्या बाबतीत देशात घडणाऱ्या घटना मुद्दाम दाखवीत नाही असे जवळपास शंभर टक्के लोक बोलले. दिल्लीचे काही पत्रकार तर आपण म्हणजे सर्वज्ञ आहोत या माजत वावरत आहेत. भाजप सरकार निवडून यायला आणि काँग्रेसला पाडायला भाजपाने मीडियाला आजवर हजारोकोटी रुपये वाटले. फक्त गांधी घराणे संपवायला भाजप निघाली आहे. राहुल गांधी यांना हे लोक पप्पू बोलत आहेत. मात्र, हे सर्व संघोटे आणि भाजपावाले एकत्र येऊन सुद्धा यांना राहुल गांधींना संपविता आले नाही. जग विज्ञानवादी होऊन सर्वांगीण प्रगती करीत असतांना भाजप सर्वसामान्यांना धर्माच्या भाकडकथा सांगून अंधश्रद्धेकडे घेऊन चालले आहेत. स्वतःचं दुकान चालविण्यासाठी हे लोक देव नावाची भीती सर्वसामान्यांना दाखवीत आहेत. मात्र, आता बहुतांश बहुजन यांचा कावा ओळखून जागे होत आहेत हे खूप चांगले लक्षण आहे..
आज ना उद्या भाजपचे सरकार पडणारच आहे. जेव्हा लोकशाही आणि संविधानावर चालणारे दुसरे सरकार येईल तेव्हा त्यांनी या भ्रष्ट, बलात्कारी आणि थापाड्या नेत्यांवर केसेस टाकाव्यात आणि देशाशी गद्दारी करणाऱ्यांना फासावर लटकवावे. मात्र, त्याच बरोबर ज्या लाचखाऊ पत्रकार, एपस्टीन फाईल, देशातील अराजकता, मणिपूर प्रकरण, सैन्याचे प्रश्न आणि सर्वसामान्यांच्या आयुष्यातील मूलभूत समस्या हे कधीच गोदी मीडिया समोर मांडीत नाही.. यांनी पैसे खाऊन फक्त मोदी मोदीच केले आहे त्यांनाही भर चौकात चाबकेचे फटके मारावेत व जेल मध्ये टाकावे, फासावर लटकवावे.. अशी बेधडक मते लोक मांडीत आहेत. जेव्हा विरोधी पक्ष कुचकामी ठरत असेल तेव्हा पत्रकारांनी विरोधीपक्षाची भूमिका वठवायची असते, त्याचबरोबर सर्वसामान्य गोरगरिबांचा आवाज बनायचे असते. मात्र, दुर्दैवाने नव्वद टक्के मीडिया पैसे खाऊन गप्प बसला आहे. म्हणून अगोदर या मीडिया मधल्या लाचखाऊ पत्रकार आणि त्यांच्या मालकांना जे फक्त मोदींचीच तळी उचलीत आहेत आणि टाळी वाजवीत आहेत त्याला आयुष्यभराचा धडा शिकवावा.. वाचकहो सर्वसामान्य वेडे नाहीत हो.. वरील मांडलेली सर्व मते ही तुमच्या आमच्या सारख्या सामान्य लोकांची आहेत. ज्या मतदारांची आठवण अंधभक्त आणि राजकारण्यांना फक्त निवडणुकी पुरतीच येते.. अजूनही वेळ गेलेली नाही जागे व्हा.. पत्रकार आणि नेते मंडळी देशापेक्षा आणि लोकशाही तथा संविधानापेक्षा मोठे नाहीत हे कायम स्मरणात राहूद्या.. आणि मनुवादी हुकूमशाहीकडे निघालेल्या लोकांना कायमचा धडा शिकवा..
- प्रा. दिपक जाधव. संपादक शब्द खड्ग डिजिटल वृत्तपत्र..
Shabda Khadag © 2026. All Rights Reserved.
Developed By Vighnesh Technologies.