कल्याण आरटीओ आणि डोंबिवली वाहतूक उपविभाग कडून संयुक्त मोहीम राबवून एकूण 85 ऑटो रिक्षा व इतर दुचाकी वाहने तपासून एकूण 73 दोषी वाहनांवर कारवाई..

कल्याण आरटीओ आणि डोंबिवली वाहतूक उपविभाग कडून संयुक्त मोहीम राबवून एकूण 85 ऑटो रिक्षा व इतर दुचाकी वाहने तपासून एकूण 73 दोषी वाहनांवर मोटर वाहन कायदा कारवाई.. 

1988 चे कलमाअंतर्गत ई चलन मशीनद्वारे कारवाई करून 61500/- रुपयाचा दंड आकारण्यात आला आहे.. 

सविस्तर वृत्त असे की, डोंबिवली वाहतूक विभागाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय हिते यांनी डोंबिवली वाहतूक चा ताबा घेतल्यापासून बेशिस्त वाहनचालकांवर तसेच रिक्षा चालकांवर अंकुश बसला आहे.. शुक्रवार दिनांक 17/07/ 2026 रोजी सकाळी 11 ते 13: 30 वाजेदरम्यान इंद्रा चौक, बाजीप्रभू चौक,  रामनगर रिक्षा स्टॅन्ड डोंबिवली पूर्व मच्छी मार्केट, महात्मा फुले चौक डोंबिवली पश्चिम या ठिकाणी 1988 चे कलमाअंतर्गत ई चलन मशीनद्वारे कारवाई करून 61500/- रुपयाचा दंड आकारण्यात आलेले असून सदर कारवाई करीत असताना ऑटो रिक्षा आणि इतर वाहनांचे फिटनेस,इन्शुरन्स,पियूसी, परमिट, गणवेश बॅच इत्यादी तपासून दोषींवर कारवाई करण्यात आली आहे, सदर कारवाई वेळी डोंबिवली वाहतूक उपविभागाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक /श्री विजय अहिरे,  पोलीस उपनिरीक्षक /कैलास घोलप व अंमलदार तसेच कल्याण आरटीओचे  मो. वा. निरीक्षक/ श्री. आमते, मो.वा.निरीक्षक/ श्री मांजरे,  सहा. मो.वा.निरीक्षक /श्री भुसे , चालक /श्री आव्हाड. यांचे मार्फतीने संयुक्त कारवाई करण्यात आली आहे....

- प्रा. दिपक जाधव. संपादक शब्द खड्ग डिजिटल वृत्तपत्र..

- कॅमेरामन दिनकर सोमासे, शब्द खड्ग डिजिटल न्यूज़पेपर...


87

जाहिरात

ट्रेंडिंग बातम्या

Get In Touch

Dombivli

+91 9967872052

contact@shabdakhadag.in

Follow Us
लोकप्रिय बातम्या

Shabda Khadag © 2026. All Rights Reserved.

Developed By Vighnesh Technologies.