मदत कुणाला करावी हे आपल्याला कळायलाच हवे..

हल्लीच्या स्वार्थी जमान्यात उठसुठ कुणालाही मदत करण्याच्या भानगडीत अजिबात पडू नका. गरज सरली की लोक आपल्याला एका झटक्यात विसरून जातात. मग तू कोण आणि मी कोण अशी परिस्थिती समोर येते..

काही मंडळींना आपण इतक्या संधी उपलब्ध करून देतो मात्र त्यांची वैचारिक पात्रताच नसल्याने आपण दिलेली संधी त्या लोकांना घेता येतच नाही.. मुळात आपण ज्यांना संधी उपलब्ध करून देतोय त्या लोकांना आपण त्यांना काय उपलब्ध करून देतोय हेच कळत नसेल तर अशा लोकांच्या पाठी लागून हे करा रे, ते करा रे असे बोलण्यात काहीच अर्थ नसतो. खरे तर आपणच मूर्ख असतो अशा कुठल्याही माणसांच्या पाठीशी उभे राहतो.. आपल्या मेहनतीची समोरच्याला किंमतच नसेल तर असे लोक खड्ड्यात गेले तरी त्यांना मुळीच वाचवायला जाऊ नये.. भिकाऱ्यालाही भीक देतांना हजारदा विचार करावा की तो त्या लायकीचा आहे की नाही.. मला इतरांसाठी मी चांगुलपणा केल्याचे फार वाईट अनुभव आलेले आहेत. खरे तर आपणच एखाद्याला शहाणं करायला जातो व मग हा शहाणा झालेला आपल्याच कानात लघुशंका करून ठेवतो. म्हणून सावध रहा आणि उगीचच कुणाला शहाणं करण्याच्या आणि मदत करण्याच्या भानगडीत पडू नका..

- प्रा. दिपक जाधव. संपादक शब्द खड्ग डिजिटल वृत्तपत्र..

113

जाहिरात

ट्रेंडिंग बातम्या

Get In Touch

Dombivli

+91 9967872052

contact@shabdakhadag.in

Follow Us
लोकप्रिय बातम्या

Shabda Khadag © 2026. All Rights Reserved.

Developed By Vighnesh Technologies.