माझी फोटोग्राफी : डोंबिवलीच्या बेशिस्त वाहनचालकांचा पदचाऱ्यांना त्रास..

वाहनांची आणि लोकांची संख्या खूप ज्यास्त आणि वाहतूक पोलिसांची संख्या कमी अशा अवस्थेत सध्या डोंबिवलीतील वाहतूक विभाग मार्गक्रमण करीत आहे..

मात्र, पोलीस संख्येने जरी कमी असले तरी ते त्यांचे काम अतिशय चोख बजावीत आहेत. मात्र, खूपसे वाहनचालक, रिक्षा आणि बाईकवाले वाहतुकीचे नियम पायदळी तुडवून कुठूनही वाहने घालीत असल्याने पदचारी हैराण झाले आहेत. अशाच वाहतूक कोंडीचा फोटो टिपला आहे शब्द खड्गचे उप संपादक विलास चव्हाण यांनी.. सदर फोटो डोंबिवली पश्चिम, पंडित दीनदयाल मार्गावरील हनुमानमंदिरा जवळील आहे. वाहतूक पोलीस वाहनचालकांचे नेहमीच प्रबोधन करीत असतात. पण, फार कमी चालक हे नियम पाळतात..  वाहतुकीचे नियम वाहन चालक आणि पदचाऱ्यांनी सुद्धा पाळायला हवेत असे या प्रसंगातून सांगावेसे वाटते.. 

- विलास चव्हाण. उप संपादक शब्द खड्ग डिजिटल वृत्तपत्र..

62

जाहिरात

ट्रेंडिंग बातम्या

Get In Touch

Dombivli

+91 9967872052

contact@shabdakhadag.in

Follow Us
लोकप्रिय बातम्या

Shabda Khadag © 2026. All Rights Reserved.

Developed By Vighnesh Technologies.