प्रेम..

हल्ली माणसाचा प्रामाणिक स्वभाव न बघता फक्त वरल्या अंगाला बघून तथा शो शायनिंगला भुलून खूपशा मुली आयुष्याचं मातेरं करून घेत आहेत. व्हॉट्सॲप युनिव्हर्सिटीत तयार झालेली तरुणपिढी व्हॉट्सॲप वर मारलेल्या बऱ्याचशा बढाया आणि थापांना खरे समजू लागली आहे..

नेहमी हुशार मुली टपोरी मुलांना भुलतात आणि चांगल्या सोज्वळ मुलांना नाकारून स्वतःच्या आयुष्याचं मातेरं करून घेतात. फार मोठ्या प्रमाणात ही बेधडक आणि बिनधास्त मुलं मग अशा मुलींचा प्रेम या नावाखाली वापर करून या मुलींना या मुलांचे मन भरले की टाकून देतात. खूपदा याला लिव्ह-इन-रिलेशन चे नाव दिले जाते. खरं सांगू तुम्ही याला कुठलेही नाव द्या पण हे सर्व मुली आणि स्त्रियांचा शारीरिक  गैरफायदा घेण्यासाठी रचलेले नाट्य असते. त्यात हल्लीच्या खूपशा मुली घरातील आई, वडील, मित्र, मैत्रिणी, भाऊ, बहिणींचे ऐकत नाहीत. प्रेमाचे भूत मानगुटीवर बसले की काहीच सुचत नाही. प्रेम आंधळे आणि बहिरे सुद्धा असते.. आणि माफ करा पण हल्ली खूपशा मुलं मुलींना इज्जत आणि शरीरधर्म, पवित्र अपवित्र याचे घेणे देणे नाही. कपडे बदलावेत अशा मुली आणि मुले सर्रास बदलली जातात. पूर्वी सारख्या भावना आता खूप मुली मुलांमध्ये अभावानेच आढळतात. आम्ही सुशिक्षित आहोत, आम्हाला आमचे भले बुरे कळते अशी वाक्य तोंडावर फेकली जातात. खरं प्रेम अगदी काहीही झाले तरी मरे पर्यंत साथ देणारं असतं, शारीरिक गैरफायदा घेऊन एखाद्याला अथवा एखादीला मरणाच्या आणि वेदनेच्या वाटेवर सोडणारं नसतं. आणि हेच खूप लोकांना कळतच  नाही. पत्रकार म्हणून अशा अनेक गोष्टी मी जवळून पाहत आहे.. सगळं संपल्यावर या प्रेमी युगुलांना वास्तव लक्षात येते. दुर्दैवाने तेव्हा वेळ निघून गेलेली असते. आणि म्हणूनच वरल्या शो शायनिंगला न भुलता समोरच्याची प्रामाणिकता तपासून पहा. असे नाही केल्यास प्रेमात तुमचा गेम व्हायला वेळ लागणार नाही..

- प्रा. दिपक जाधव. संपादक शब्द खड्ग डिजिटल वृत्तपत्र..

304

जाहिरात

ट्रेंडिंग बातम्या

Get In Touch

Dombivli

+91 9967872052

shabda.khadag@gmail.com

Follow Us
लोकप्रिय बातम्या

Shabda Khadag © 2026. All Rights Reserved.

Developed By Vighnesh Technologies.