कुणाचे कधी कुठे आणि केव्हा नाते जुळेल हे सांगता येत नाही. आता इथे आपण आज प्रेमाच्या नात्याचा नाही तर लहान मोठे वय विसरून जुळलेल्या मैत्री आणि भावनेच्या नात्यांचा विचार करूया..
आपल्या शब्द खड्ग डिजिटल वृत्तपत्राच्या माध्यमातून यापूर्वी खूपदा आपण अशा स्वरूपाच्या वेगवेगळ्या विषयांवर परिसंवाद आयोजित केले आहेत. येत्या काळात सुद्धा असे मनाला स्पर्श करणारे आणि एकाकी मनाला उभारी देणारे प्रेरणा देणारे परिसंवाद आपल्या शब्द खड्ग डिजिटल वृत्तपत्राच्या माध्यमातून आयोजित करीत आहोत. रोजच्या जगण्यात खूपशा लोकांकडे पैसे भरपूर असतात पण मनाला स्थैय नसते. मन सतत कुठल्या न कुठल्या दडपणात वावरत असते. आणि हे शक्यतो ज्येष्ठ स्त्री - पुरुषांच्या बाबतीत जास्त घडत असते. आपण अशा स्त्री - पुरुषांसाठी या विषयातील एखाद्या तज्ज्ञाला बोलवून या तज्ज्ञ वक्त्यामध्ये आणि उपस्थितांमध्ये प्रश्नोत्तरांच्या माध्यमातून परिसंवाद घडवितो. यातून बऱ्याच लोकांचे मन हलके होते व जगण्यासाठी एक वेगळी दिशा व आशा निर्माण होते. आपण या परिसंवादात अगदी सगळे विषय हाताळतो. मला स्वतःला अनेक ठिकाणी विविध विषयांवर मार्गदर्शन करायला बोलवतात. मित्रांनो आपल्याला परिसंवादासाठी विषयाचे मुळीच बंधन नाही. आणि म्हणून जास्तीत जास्त लोकांनी आपल्या शब्द खड्ग परिवारात सामील व्हावे असे आम्ही आवाहन करीत आहोत..
- प्रा. दिपक जाधव. संपादक शब्द खड्ग डिजिटल वृत्तपत्र..
Shabda Khadag © 2026. All Rights Reserved.
Developed By Vighnesh Technologies.