शब्द खड्ग डिजिटल वृत्तपत्राने सर्वसामान्यांना या संदर्भात छेडले असता अनेक बेधडक विधाने कानी पडली..
सर्वसामान्यांच्या मते.. मुळात भारत हा लोकशाही असलेला व संविधानावर चालणारा देश आहे. आपल्याकडे सार्वभौमत्व आहे त्यामुळेच अनेकतेत एकता पाहायला मिळायची. मात्र, गेल्या बारा वर्षांपासून भाजपाची सत्ता आल्यावर त्यांनी अगदी पद्धतशीरपणे लोकशाही संपविण्याची तयारी सुरु केली. शंभरी गाठलेली त्यांची आरएसएस ही संघटना त्याकाळी वल्लभभाई पटेल यांनी अतिरेकी संघटना म्हणून घोषित केली होती.. देशाच्या स्वातंत्र्य संग्रामात शून्य योगदान दिलेली आणि ब्रिटिशांना सतत मदत केलेली आरएसएस आता देशप्रेमी असल्याचा पुळका आणीत असल्यामुळे लोकांना त्यांचा खूप राग आहे. आणि थापाडे मोदी यांचे तर पितळ उघडे पडल्याचे आता जग सुद्धा दाखवून देत आहे. देवेंद्र फडणवीस तसा अभ्यासू माणूस आहे. पण, भाजपात असल्याने त्यांचेही बारा वाजले आहेत.
मीडियाला हाताशी धरून आणि खोट्या प्रगतीच्या बातम्या पेरून मोदी आणि त्यांच्या भाजपने देशाचे बारा वाजवले आहेत. आता लोकांना त्यांचे सर्व काळेधंदे कळल्याने भाजपाला उतरती कळा लागली आहे. आत पुन्हा समतेचे राज्य यावे.. संविधानावर चालणारी लोकशाही रुजावी.. मनुवाद नष्ट व्हावा आणि विज्ञानवाद अंगीकारून अंधश्रद्धेला मूठमाती द्यावी तथा स्त्री पुरुषांना निर्धोकपणे आपले जीवन जगता यावे.. आणि हे सर्व लोकशाहीतच शक्य असल्याने भारतात नेपाळ आणि श्रीलंके सारखी क्रांती घडणे काळाची गरज आहे.. असे मत सर्वसामान्य जनतेने शब्द खड्ग डिजिटल वृत्तपत्राचे मंचावर मांडले आहे..
- प्रा. दिपक जाधव. संपादक शब्द खड्ग डिजिटल वृत्तपत्र..
Shabda Khadag © 2026. All Rights Reserved.
Developed By Vighnesh Technologies.