सर्पमित्राने पकडला पावसात साप.. डोंबिवलीतील घटना..

शुक्रवार दिनांक 3/7/26 रोजी कोपर चौकी डोबिबली (पश्चिम ) येथे मागील बाजूस एका  झाडाला व दगडखडीमध्ये एक मोठा नाग अडकलेल्या परिस्थितीत दिसला. त्यास काढण्याचा प्रयत्न केला परंतु निघला नाही नंतर दिनकर सोमासे यांनी फोन द्वारे सर्पमित्र ऋषिकेश सुरसे यांना तेथील परिस्थिती सांगितली. त्यांनी तात्काळ येऊन नाग काढण्यासाठी अनेक प्रयत्न केले. पण तो दगडखडीमध्ये  अडकल्यामुळे निघणे अशक्य होते. नंतर सर्पमित्र ऋषिकेश सुरसे यांनी एक तास प्रयत्न करून नाग काढण्यात यश मिळवले. अशाप्रकारे पावसामध्ये अनेक ठिकाणी सर्प निघण्याची शक्यता असते तरी सर्वांनी आपल्या आजूबाजूस किंवा बुट, छत्री यामध्ये काही असल्याची खात्री करावी असे ऋषिकेश सुरसे यांनी सर्वांना सांगितले. ऋषिकेश सुरसे हे  गेली बारा- तेरा वर्षांपासून P.A.W.S या संस्थेत सर्प पकडण्याचे काम करीत आहे तसेच अनेक सर्पमित्र त्यांच्याबरोबर आहे. सर्व नागरिकांनी आपली काळजी घ्यावी व पावसाळ्यात कुठेही सर्प दिसल्यास त्वरित खाली दिलेल्या नंबरवर संपर्क साधून योग्य ती काळजी घ्यावी..

ऋषिकेश सुरसे सर्पमित्र- ८४२५८४३४७०..

- दिनकर सोमासे. कॅमेरामन शब्द खड्ग डिजिटल वृत्तपत्र..

131

जाहिरात

ट्रेंडिंग बातम्या

Get In Touch

Dombivli

+91 9967872052

contact@shabdakhadag.in

Follow Us
लोकप्रिय बातम्या

Shabda Khadag © 2026. All Rights Reserved.

Developed By Vighnesh Technologies.