डोंबिवली 30 जून 2026 : पावसाने बऱ्यापैकी ओढ दिल्याने संपूर्ण महाराष्ट्र पावसाची चातका प्रमाणे वाट पाहत होता. मुंबईत गेले दोन दिवस पावसाने थोडी सुरुवात केली असली तरी डोंबिवलीकर मात्र उन्हाच्या झळांनी आणि पिण्याच्या पाण्याची कल्याण-डोंबिवली महानगरपालीकेने केलेल्या कपातीने प्रचंड हैराण झाले आहेत..
त्यातच वारंवार जाणारी लाईट आणि स्मार्ट मीटर लावल्याने येणारी भरमसाठ विजेची बिले. अक्षरशः यामुळे सर्वसामान्य डोंबिवलीकर हैराण असतांनाच आज मंगळवार दिनांक 30 जून 2026 रोजी दुपारी साडेबारा ते एकच्या दरम्यान पावसाने चांगली सुरुवात केल्याने डोंबिवलीकर सुखावले. मात्र, अजूनही खोदून ठेवलेल्या रस्त्यांची कामे पूर्ण न झाल्याने पादचारी, रिक्षा , टू व्हीलर आणि फोर व्हीलरवाले हैराण आहेत. प्रशासन आणि संबंधित याकडे लक्ष देतील का ? असा लोकांचा सवाल आहे..
- सौ. साईली सुनिल बनसोडे. विशेष प्रतिनिधी शब्द खड्ग डिजिटल वृत्तपत्र..
Shabda Khadag © 2026. All Rights Reserved.
Developed By Vighnesh Technologies.