एकनाथ शिंदेंच्या नावाने बोटे मोडण्यापेक्षा आपले कुठे चुकले याचा उद्धवजी विचार करतील काय .??

शब्द खड्गने सर्वसामान्य लोकांशी या संदर्भात केलेला रोखठोक संवाद आणि सर्वसामान्यांची मते.. 

एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेशी गद्दारी केली व पक्ष आणि सर्वच बळकावले हे जरी खरे असले तरी मग उद्धव ठाकरे काय करीत होते ? ते काय दोन अडीच वर्ष सलग आजारी नव्हते. महाराष्ट्रभरातून येणारे आमदार, खासदार, नगरसेवक आणि सर्वसामान्य शिवसैनिकांना भेटायला उद्धवजींकडे वेळ नसायचा आणि मग हे लोक एकनाथ शिंदेंना भेटून त्यांची कामे करून घ्यायचे. एकनाथ शिंदे हे फिल्ड वरचे कार्यकर्ते आहेत. त्यांना सर्वसामान्यांची नाळ ठाऊक आहे आणि ते त्यासाठी आजही अहोरात्र झटतात सुद्धा. उद्धव ठाकरे साहेबांचे असे घडताना लोकांना आणि कार्यकर्ते, पदाधिकारी आणि आमदार, खासदार, नगरसेवकांना दिसलेच नाही. राजकारणात प्रत्येकवेळी इमोशनल राहून चालत नाही. बाळासाहेबांचा जमाना केव्हाच सरला. लोक घराणेशाह्यांना उखडून टाकीत आहेत. राहुल गांधी एकमेव भाजपाला नडणारा नेता आहेत तरी त्यांच्यावरही घराणेशाहीचा ठपका ठेवला जातोच ना.. 

घरात बसून आणि जुन्या आठवणी सांगून राज्य करता येत नाही हे उद्धव साहेबांना कळत नसेल काय ? शिंदेंकडे आमदार, खासदारांना पैसे मिळतो, शिंदेंचा वेळ मिळतो आणि त्यांच्या कर्तृत्वाला आणि पुढे जायला संधी मिळते. शिंदे सढळ हस्ते मदत करतात असे लोक बाहेर बोलतात. उद्धवजी असे कधी काही करीत नाहीत. ही राजेशाही नाही हो तुमचे सर्वच ऐकायला हेच उद्धवजींना लक्षात येत नाही. कुणीही सोम्या गोम्या उठून ठाकरेंची टीका करीत सुटतो आणि उद्धवजी त्या लोकांचे काहीच करू शकत नाहीत यातच उद्धवसेनेचा पराभव आहे. उद्धवजी लोकांमध्ये फिरा हो.. घरात बसून तुम्ही जे बोलाल ते ऐकायला कुणाकडेच वेळ नाही आणि तेवढा तुमच्या सेनेचा दरारा आता उरलेला नाही.

शिंदेंचे कधीच आणि कुणीच समर्थन करणार नाही हे जरी खरे असले तरी शिंदेंमध्ये टीका झेलण्याची आणि काम करण्याची उर्मी आणि जिगर आहे ती तुमच्यातही आहे असे दाखवून द्या उद्धवजी.. तुमच्या मदतीला कुठलाच देव येणार नाही कारण या जगात देव अस्तित्वातच नाही. तुमची मदत तुम्हालाच करायची आहे. सुषमा अंधारे, अयोध्या पोळ तुमच्यासाठी चांगल्या लढतात. पण संजय राऊतांना तुम्ही आवरायला हवे. इथे प्रत्येकालाच साम, दाम, दंड, भेद या नीती वापरून प्रगती करण्याचा अधिकार आहे तोच अधिकार शिंदे वापरीत आहे. तुम्हाला कुणी रोखलं आहे उद्धवजी..?? अजूनही वेळ गेली नाही जागे व्हा.. भाजपाला भारतावर एकछत्री सत्ता आणायची आहे म्हणून ते आमदार, खासदार फोडीत आहेत. या लोकांची संख्या वाढल्यावर भाजपाला हवे ते घटनेत त्यांचा मनाप्रमाणे बदल करता येतील हे आपणांस ठाऊक नाही काय उद्धवजी ? अशी रोखठोक मते शब्द खड्ग सोबत चर्चा करतांना सर्वसामान्यांनी मांडली आहेत.. 

- प्रा. दिपक जाधव. संपादक शब्द खड्ग डिजिटल वृत्तपत्र..

65

जाहिरात

ट्रेंडिंग बातम्या

Get In Touch

Dombivli

+91 9967872052

contact@shabdakhadag.in

Follow Us
लोकप्रिय बातम्या

Shabda Khadag © 2026. All Rights Reserved.

Developed By Vighnesh Technologies.