उद्धव ठाकरे यांचे 14 ते 16 आमदार एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत जाणार असल्याची सूत्रांकडून माहिती..

 राजकीय वर्तुळातून येत असलेल्या वृत्तानुसार, उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना (UBT) पक्षाला मोठा धक्का बसण्याची शक्यता वर्तवली जात आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, १४ ते १६ आमदार आणि ६ ते ७ खासदार एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेत जाण्याच्या तयारीत आहेत..

या परिस्थितीचा थोडक्यात गोषवारा खालीलप्रमाणे आहे:आमदार आणि खासदारांचा गट: शिवसेनेतील (UBT) सुमारे १४ ते १६ आमदार आणि ६ खासदार बंडखोरीच्या मार्गावर असल्याच्या चर्चा आहेत. हे सर्व आमदार आणि खासदार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या संपर्कात असल्याचे सांगितले जात आहे.'ऑपरेशन टायगर' (Operation Tiger): राजकीय वर्तुळात या संभाव्य बंडाला 'ऑपरेशन टायगर' असे नाव दिले गेले असून, वाटाघाटी अंतिम टप्प्यात असल्याचे वृत्त आहे.

संजय राऊत यांची प्रतिक्रिया:

या वृत्तांवर प्रतिक्रिया देताना शिवसेना (UBT) नेते खासदार संजय राऊत यांनी बंडखोर नेत्यांवर गंभीर आरोप केले आहेत. खासदारांना पक्षांतर करण्यासाठी मोठी रक्कम ऑफर केली जात असल्याचा दावा त्यांनी केला आहे.पक्षाची सावधगिरी: या संभाव्य फुटीच्या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे यांनी पक्षातील आमदारांवर बारीक लक्ष ठेवण्यास सुरुवात केली आहे आणि ते स्वतः वैयक्तिक पातळीवर आमदारांशी संवाद साधत आहेत.

या संदर्भात शब्द खड्गने सर्वसामान्य मतदारांशी चर्चा केली :

मतदार आणि सर्वसामान्यांच्या मते या गद्दाराच्या अगोदर ज्यांनी त्यांना फोडले आहे अशा लोकांना कपडे काढून भर चौकात फटके द्यायला हवेत. तर बहुतांश लोकांच्या मते आतातरी पक्षांतर बंदीचा कायदा प्रत्यक्षात उतरायला हवा. किमान पाच वर्ष तरी तुम्ही ज्या पक्षातून निवडून आलेले आहेत त्या पक्षात राहणे बंधनकारक करावे. पुढील निवडणुकीत निवडणूक होण्या आधी तुम्ही पक्ष सोडू शकता. काही म्हटले गद्दारी करणाऱ्या अशा लोकांवर कायमची बंदी घालावी. लोकांनी अशा गद्दारांना निवडून देऊ नये. काही लोकांच्या मते एकनाथ शिंदे जरी आज खुशीने गाजरं खात असले तरी भाजप एकनाथ शिंदेंची शिवसेना. अजित पवारांचा राष्ट्रवादी आणि शरद पवारांचा राष्ट्रवादी यांना सुद्धा याच प्रकारे संपवेल. भाजपला फक्त एकाच स्वतःचा पक्ष या देशात ठेवायचा असून हिंदुत्व हिडणुत्व करून पुन्हा देशाला देव धर्म नावाच्या भ्रामक आणि अंधश्रद्धेत गुंतवून जातीयवाद जोपासायचा आणि पोसायचा आहे. दुर्दैव हे आहे की, शिक्षणाच्या मागे न लागत बहुजन अजूनही देव, धर्म आणि कर्मकांडात गुंतलेले असल्याने संघोटे भाजपवाले  बहुजनांच्या अंधश्रद्धेचा गैरफायदा घेत आहेत. 

उद्धव ठाकरे पहिल्यापासून कुठे चुकले याचा त्यांनी आतातरी गांभीर्याने विचार करावा असेही खूप लोक बोलले. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला भाजप इतक्यात संपविणार नाही कारण प्रत्यक्ष अप्रत्यक्षपणे मनसे भाजपला फायद्याची ठरत आहे. कारण हिंदू मते उद्धव सेना आणि मनसे मुळे विभागली जाऊन त्याचा फायदा भाजपला होत आहे. संघविचारी भाजप लोकशाहीला खूप घातक आहे हे जरी खरे असले तरी फुटीची सुरुवात केलेल्या राज ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांना इतिहास कधीच माफ करणार नाही असेही खूप लोकांचे म्हणणे आहे.

येत्या काळात काय काय पाहायला मिळणार आहे ते फक्त बघत बसायचे. कारण सर्वसामान्य मतदार फक्त घरातूनच चर्चा करतो तो रस्त्यावर केव्हाच उतरत नाही. या सर्वसामान्यांनी आता रस्त्यावर उतरून गद्दारांना धडा द्यायला हवा व लोकशाही वाचवायला हवी.. 

- प्रा. दिपक जाधव. संपादक शब्द खड्ग डिजिटल वृत्तपत्र..

65

जाहिरात

ट्रेंडिंग बातम्या

Get In Touch

Dombivli

+91 9967872052

contact@shabdakhadag.in

Follow Us
लोकप्रिय बातम्या

Shabda Khadag © 2026. All Rights Reserved.

Developed By Vighnesh Technologies.