मनाने मोठी असलेली माणसे हल्ली दुर्मिळ होत आहेत कारण..

समोरच्याचा मोठेपणा मान्य  करण्याची मनाची तयारी नसलेली माणसे नेहमी कण्हत कुढत राहतात.. वय वाढले म्हणजे तुम्हाला अक्कल आली, तुम्ही हुशार झालात असे मुळीच नाही..

मी नेहमी म्हणत आलोय की, एखाद्या सात आठ वर्षाच्या मुला - मुलीला परिस्थितीने उंबऱ्याबाहेरच्या वास्तविक जगाचा धडा दिला असेल तर अशी मुले कमी वयातच परिपक्व आणि पोक्त होतात. या उलट काही साठी - सत्तरीचे म्हातारे - म्हाताऱ्या जे  सुखवस्तू आयुष्य जगत आले आहेत त्यांना एकूणच वास्तवाची, परिस्थितीच्या दाहकतेची  तितकीशी जाणीव नसते.. आणि सगळ्यात महत्वाचे म्हणजे कुणाशी स्पर्धा करायची नसते. आपल्याला एखादी गोष्ट समोरच्या इतकी चांगली येत नसेल तर त्या समोरच्यावर जळण्यापेक्षा आपल्याला प्रयत्न करूनही येत नाही ही वस्तुस्थिती स्वीकारावी.. आणि समोरच्याचे मोठेपण खुल्यामनाने मान्य करावे.. हल्ली सगळीकडे पाय ओढणारी माणसे मोठ्या प्रमाणात वाढली असल्याने मनाचा मोठेपणा दाखविणारी माणसे आता कमी होऊ लागली आहेत.. म्हणजे असे की, ही माणसे आता मदतीला पुढे येत नाहीत कारण आपण प्रामाणिकपणे मदत केलेला माणूस आपल्याशीच गद्दारी करतोय हे या लोकांना सुद्धा कळून चुकलेले आहे. अरे मन मोठे ठेवा, आळस  झटका आणि कितीही समस्या असल्या तरी आजचा दिवस आणि हा क्षण आपला आहे असे समजून आयुष्याला बिनधास्त भिडा.. आणि आपली काळजी घेणाऱ्या आपल्या हितचिंतकांच्या संपर्कात रहा आणि त्यांच्याशी प्रामाणिक रहा.. 

- प्रा. दिपक जाधव. संपादक शब्द खड्ग डिजिटल वृत्तपत्र..

159

जाहिरात

ट्रेंडिंग बातम्या

Get In Touch

Dombivli

+91 9967872052

contact@shabdakhadag.in

Follow Us
लोकप्रिय बातम्या

Shabda Khadag © 2026. All Rights Reserved.

Developed By Vighnesh Technologies.