आपलं शब्द खड्ग डिजिटल वृत्तपत्र नेहमीच नवनवे उपक्रम राबवून नवोदितांना आपल्यासोबत काम करण्याची संधी देत आलेले आहे. याच माध्यमातून आपल्या शब्द खड्गचा विशेष प्रतिनिधी / फोटोग्राफर आणि सध्या रशियात वैद्यकीय MBBS चे शिक्षण घेणारा आणि प्रा. दिपक संभाजी जाधव. संपादक शब्द खड्ग डिजिटल वृत्तपत्र यांच्या तालमीत तयार होत असलेला जय डगळे अर्थात मी.. माझ्यासाठी दिपक सरांनी खास 'थेट रशियातून..' हे सदर सुरु केले आहे. माझ्या अभ्यासातून जेव्हा मला वेळ भेटेल तेव्हा रशियातील वेगवेगळ्या ठिकाणांचे फोटो आणि माहिती देण्यास दिपक सरांनी मला सांगितले आहे. व अगोदर अभ्यास कर आणि वेळ भेटलाच तरच फोटो आणि माहिती पाठविण्याचे काम कर असेही त्यांनी आवर्जून मला सांगितले आहे. मी आज रशियातील मॉस्को चे काही फोटो पाठवीत आहे. हळूहळू मी ज्या जागा एक्सप्लोअर करेल त्यांचीही माहिती आपल्या शब्द खड्ग डिजिटल वृत्तपत्राला देणार आहे. माझ्या आयुष्यात कॅमेरामन म्हणून मला पहिला ब्रेक दिपक सरांनी दिला. तेव्हा मी अकरावीत प्रवेश घेतला होता. आणि आज माझ्यासाठी खास त्यांनी 'थेट रशियातून..' हे सदर सुरु केले आहे. मी शब्द खड्ग आणि प्रा. दिपक जाधव सरांचा खूप खूप आभारी आहे..
- जय डगळे.. ( रशिया ) विशेष प्रतिनिधी / फोटोग्राफर शब्द खड्ग डिजिटल वृत्तपत्र..
Shabda Khadag © 2026. All Rights Reserved.
Developed By Vighnesh Technologies.