एकांतात राहण्या पेक्षा आपल्या माणसांत रहा..

मनातलं पान..

प्रत्येकच वेळी गर्दीत राहणे जसे बरे नाही तसे प्रत्येकच वेळी एकांतात राहणे सुद्धा बरे नाही. खरे तर एकांता पेक्षा आपल्या माणसांच्या गर्दीत राहणे केव्हाही उत्तम.. आपल्या माणसांत राहिल्याने आपल्याला मानसिक आधार मिळतो. आपली माणसे आपल्याशी भांडतील, रुसतील पण वेळ आल्यावर हीच माणसे आपल्या मदतीला उभी राहतील.

एकांतात राहिल्याने माणूस आळशी होतो आणि मनाने खचून जातो. त्याला सतत आपण आजारी आहोत असा भास होत राहतो.. काही मंडळी घरकोंबडी बनतात व त्यांच्यात आळस इतका घुसतो की ही मंडळी घराच्या बाहेर पडायला खूपच कंटाळा करतात. अशा व्यक्तींना चार पावलेही चालण्याचा कंटाळा येतो. रिक्षा अथवा गाडी शिवाय यांचे पान हलत नाही.. आणि ही माणसे मनाने हरल्याने सतत निरुत्साही आणि नकारात्मकच बोलत राहतात. त्यांना काहीही सांगा त्यांच्यात उत्साह नसतो.. ते नवीन कल्पना स्वीकारीत नाहीत आणि सुचवत सुद्धा नाहीत. हे लोक लढण्याआधीच हत्यार खाली ठेऊन देतात. 

आपल्या माणसांत राहिल्याने सतत सुख दुःखाची देवाणघेवाण होते. कथा कल्पना प्रत्यक्षात उतरवायला मानसिक बळ मिळते आणि माणूस एकटा पडत नाही. जे काही दुःख असेल ते आपल्या माणसांच्या आणि कधीकधी अनोळख्यांच्या गर्दीत विसरायला होते. आणि म्हणूनच माणसाने जास्तीत जास्त आपल्या माणसांमध्ये, आणि कधीकधी अनोळखी  गर्दीत सुद्धा रमायला हवे.. 

- प्रा. दिपक जाधव. संपादक शब्द खड्ग डिजिटल वृत्तपत्र..

225

जाहिरात

ट्रेंडिंग बातम्या

Get In Touch

Dombivli

+91 9967872052

contact@shabdakhadag.in

Follow Us
लोकप्रिय बातम्या

Shabda Khadag © 2026. All Rights Reserved.

Developed By Vighnesh Technologies.